छत्रपती संभाजीनगर : बारावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा असतो. यावरून अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरत असतं. नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील शार्दुल भालेराव हा देखील चांगल्या मार्गाने पास झाला आहे. शार्दुलचे पेपर चालू असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. तरी देखील त्याने न खचता अभ्यास करून बारावीमध्ये 94 टक्के गुण मिळवले आहेत.
advertisement
कसं मिळवलं यश?
शार्दुल श्रीकांत भालेराव हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचा आहे. आयआयव्ही कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत होता. वाणिज्य शाखेमधून त्याने बारावीचे पेपर दिले. बारावीमध्ये शार्दुलला 94 टक्के एवढे गुण मिळाले आहेत. शार्दुल सांगतो की, जेव्हा बारावीत गेलो तेव्हापासून मी बोर्डाच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. मी दररोज तीन ते चार तास अभ्यास करायचो. जर मला काही अडचणी आल्यातर त्या मी माझ्या शिक्षकांना विचारायचो आणि ते मला समजून सांगायचे. यामुळे मला पेपर देण्यासाठी सोपे गेले.
जिद्द महत्त्वाची! साताऱ्यातील मायलेकी सोबत झाल्या बारावी पास, दुर्गम भागात राहून मिळवलं यश
कठीण परिस्थितीमध्ये घरच्यांची साथ
6 मार्च रोजी अचानक हृदय विकाराच्या झटक्याने माझ्या वडिलांचे निधन झाले आणि माझ्यासमोर दुःखाचा डोंगर उभा राहिला. तेव्हा माझे पेपर चालू होते. मला काय करावं हे काय सुचत नव्हतं. पण या कठीण परिस्थितीमध्ये मला माझ्या घरच्यांनी खूप साथ दिली. वडिलांचा अंत्यसंस्कार करून मी घरी आलो आणि परत अभ्यासाला लागलो. सकाळी पेपरला गेलो. माझा अकाउंटचा पेपर होता. मी पेपर दिला यामध्ये मला 100 पैकी 100 गुण मिळाले, असं शार्दुल भालेरावने सांगितले.
मी सर्व पेपर व्यवस्थित अभ्यास करून दिले. यामध्ये मला माझ्या घरच्यांनी सावरायला मदत केली आणि मला बारावीमध्ये 94 टक्के मिळाले. मला भविष्यामध्ये पुढे सीएस करायचा आहे. त्यासाठी देखील मी माझे प्रयत्न सुरू केले आहेत. माझ्या वडिलांची देखील इच्छा होती की मी सीएस करावं. मला माझ्या वडिलांची ही इच्छा पूर्ण करायची आहे आणि मी ती नक्कीच पूर्ण करेन अगदी मेहनतीने, असंही शार्दुल भालेराव सांगतो.
बारावी परीक्षेत पुण्याच्या इशिताला 97.33 टक्के गुण, क्लास न लावता कसं मिळवलं यश?
शार्दुलचे वडील अचानक गेल्याने आमच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. काय करावं हे सुचत नव्हतं. शार्दुलचे पेपर देखील चालू होते. शार्दुलने त्याच्या वडिलांवरती अंत्यसंस्कार केले आणि परत अभ्यासाला लागला. यामध्ये मी पण त्याच्या सोबत होते. त्याने एवढ्या कठीण परिस्थितीत चांगला अभ्यास करून 94 टक्के गुण मिळवले याचा मला खूप अभिमान आहे. भविष्यात त्याला जे पण काय करायचंय आहे त्याने ते करावे मी खंबीरपणे त्याच्यासोबत उभी आहे, असं शार्दुलची आई राजश्री यांनी सांगितले.