TRENDING:

माजी विद्यार्थ्याचं समाजभान, गोळा झालं कोटींचं दान, ZP शाळेचा छ. संभाजीनगर पॅटर्नची महाराष्ट्रात चर्चा

Last Updated:

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील एक कल्पक उपक्रम आता थेट राज्याच्या शिक्षण धोरणाचा भाग ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाने माजी विद्यार्थ्यांना पुन्हा त्यांच्या शाळेशी जोडण्याचा उपक्रम हाती घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषदेच्या शाळांमधील एक कल्पक उपक्रम आता थेट राज्याच्या शिक्षण धोरणाचा भाग ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाने माजी विद्यार्थ्यांना पुन्हा त्यांच्या शाळेशी जोडण्याचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमातून शाळांचा चेहरामोहरा बदलला आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी लाखो रुपयांचे योगदान मिळाले. या यशस्वी पॅटर्नने राज्य शासनाचेही लक्ष वेधले असून, आता तो संपूर्ण महाराष्ट्रभर लागू केला जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगरचा शिक्षण पॅटर्न ठरला राज्यासाठी प्रेरणादायी<br> 
छत्रपती संभाजीनगरचा शिक्षण पॅटर्न ठरला राज्यासाठी प्रेरणादायी<br> 
advertisement

या अभिनव मोहिमेअंतर्गत माजी विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील झेडपी शाळांना तब्बल दोन कोटी रुपयांच्या विविध वस्तू भेट दिल्या आहेत. त्यासोबतच सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) अंतर्गत 37 कोटी रुपयांचे साहित्य आणि सुविधा जिल्ह्यातील शाळांपर्यंत पोहोचल्या आहेत. या यशस्वी उदाहरणामुळे संभाजीनगरचा पॅटर्न राज्यभर गाजू लागला आहे.

Diwali Crackers: लवंगी अन् रॉकेट सगळेच फटाके धोकादायक, MPCB चा धक्कादायक अहवाल समोर

advertisement

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याच पद्धतीचा अवलंब करून राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरचा मॉडेल आता प्रत्येक शाळेत दिसणार आहे. प्रत्येक संघाचा अध्यक्ष माजी विद्यार्थी, सचिव शाळेचा मुख्याध्यापक, तर कोषाध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी इतर माजी विद्यार्थी असतील.

advertisement

सदस्यांमध्ये पालक प्रतिनिधी, सेवानिवृत्त शिक्षक आणि उपक्रमशील शिक्षकांचा समावेश असेल. ही रचना शाळा आणि समाजातील नाते अधिक दृढ करण्यासाठी आखण्यात आली आहे. माजी विद्यार्थी संघांनी प्रत्येक वर्षी गणेशोत्सव, दिवाळी, दसरा, नवरात्री, ईद, ख्रिसमस किंवा गावच्या यात्रेदरम्यान वार्षिक मेळावा घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे माजी विद्यार्थ्यांचे शाळेशी नाते टिकून राहील आणि शाळांचा सामाजिक सहभाग वाढेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ऐन दिवाळीत मका अन् कांद्याचे दर कोसळले, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

या संघांमार्फत शाळांमध्ये भौतिक सुविधा उभारणे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी उपक्रम राबवणे, शिष्यवृत्ती देणे, तसेच सामाजिक आणि भावनिक विकासाला चालना देणे या जबाबदाऱ्या पार पाडल्या जाणार आहेत. आर्थिक पारदर्शकतेवरही विशेष भर देण्यात आला आहे. माजी विद्यार्थी संघाकडून शाळांसाठी वस्तू, साहित्य, साधनं पुरवली जातील, मात्र रोख स्वरूपातील देणगी स्वीकारली जाणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने राबविलेला हा उपक्रम आज राज्यभरातील शिक्षण व्यवस्थेसाठी आदर्श आणि प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. माजी विद्यार्थी म्हणजे शाळेची ताकद हे या पॅटर्नने प्रत्यक्ष सिद्ध केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
माजी विद्यार्थ्याचं समाजभान, गोळा झालं कोटींचं दान, ZP शाळेचा छ. संभाजीनगर पॅटर्नची महाराष्ट्रात चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल