अभ्यास कसा करावा?
तुम्हाला जो विषय सोपा जातो तो पहिले अभ्यासाला घ्या. यामुळे तुमचा मूड देखील चांगला होतो. त्यानंतर जो विषय तुम्हाला अवघड जातो त्या विषयावर जास्त भर द्यायला हवा. अवघड जाणाऱ्या विषयामध्ये जे सोपे टॉपिक आहेत त्यांचा आधी अभ्यास करावा. त्यानंतर बाकीच्या टॉपिकचा अभ्यास जर केला तर निश्चितच तुमचा अभ्यास चांगला होईल आणि लक्षात देखील राहील. या पद्धतीने देखील तुम्ही अभ्यास करावा, असं एन.जी. गायकवाड सांगतात.
advertisement
बारावी परीक्षेत लिखाणाला खूप महत्त्व आहे. तुमचा लिखाणाचा सराव हा चांगला पाहिजे. कारण तीन तासांमध्ये तुमचा संपूर्ण पेपर लिहून हा व्हायलाच पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लिखाणाचा भरपूर असा सराव करावा. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात घड्याळावरती टाईम लावून तीन तासांमध्ये सर्व प्रश्नपत्रिकाही सोडून झालीच पाहिजे.
विशेष करून आर्ट आणि कॉमर्स विद्यार्थ्यांनी याचा जास्त सराव करावा. विद्यार्थ्यांनी पुस्तकांतील फक्त प्रश्न उत्तरं न वाचता संपूर्ण विषयांचे संपूर्ण पुस्तक हे वाचावे. कारण तुम्हाला पुस्तका बाहेरील कुठलाही प्रश्न हा परीक्षेमध्ये येत नाही. सर्व वाचून झाल्यानंतर पेपरमध्ये उत्तर आपल्या भाषेत लिहिले तरीसुद्धा चालते. त्यामुळे आपले वेगळेपण दिसेल आणि आपल्याला चांगले मार्क देखील भेटतील, असं एन.जी. गायकवाड सांगतात.
Job Alert: 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत बंपर नोकऱ्या, 3 हजारांपेक्षा जास्त जागांवर भरती
पेपरला जाताना तुमचं मन शांत असावं. पेपरला कुठल्या गोष्टीचा विचार न करावा आणि पूर्ण लक्ष केंद्रित करून तुम्ही पेपर सोडवावा. परीक्षेच्या काळामध्ये किंवा अभ्यास करत असताना विशेष करून पालकानी ही आपल्या पाल्याची जास्त काळजी घ्यावी. आपल्या पाल्यावर कोणतेही दडपण येणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पालकांनी आपल्या पाल्याची तुलना इतर कोणत्याही विद्यार्थ्यांशी करू नये असे जर केले तर त्यांच्या अभ्यासावरती याचा परिणाम होऊ शकतो, असंही एन.जी. गायकवाड सांगतात.