मायाने कोणताही खासगी क्लास न लावता केवळ महाविद्यालयात शिकवले जाणारे विषय समजून घेत, नियमित अभ्यास करत हे यश मिळवले आहे. ती दररोज दोन ते तीन तास अभ्यास करत असे. मी फक्त कॉलेजमध्ये दिले जाणारे लेक्चर ऐकून व पुस्तकं वाचूनच अभ्यास केला. एवढे मार्क्स मिळतील असं कधी वाटलं नव्हतं,असं माया सांगते.
advertisement
39 रुपयांत जिंकले 4 कोटी! शेतकऱ्याच्या मुलाचं पालटलं नशीब; 77 वेळा हारला होता, पण...
तिच्या यशामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या घरच्यांनाही यावर विश्वास बसत नाही. वडिलांना इतका आनंद झाला आहे की, त्यांना वाटतं हे गुण त्यांनीच मिळवले आहेत, असे ती हसत सांगते.
मायाला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायची इच्छा आहे आणि ती यशाची पुढची पायरी गाठण्याचा निश्चय करत आहे. एका छोट्याशा गावातून येऊन, कोणतीही विशेष सुविधा नसताना मिळवलेलं हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षणासाठी जिद्द, सातत्य आणि मेहनत असेल तर कोणतीही अडचण यशाच्या वाटेवर अडथळा ठरू शकत नाही, हे मायाने आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे.