राज्यातून चार प्रकारच्या क्षेत्रातील तब्बल 10 हजार कुशल कामगारांचा पुरवठा केला जात आहे. याला केंद्र शासनाने सहमती दर्शविली आहे. शैक्षणिक संस्थाबाबत सखोल मार्गदर्शन, आवश्यक ते शैक्षणिक साहित्य, विद्यार्थी आसनव्यवस्था आदींची खात्री करून संबंधित महाविद्यालयांना प्रशिक्षणाकरिता हिरवा कंदील देण्यात येतं आहे. प्रत्येक प्रशिक्षण केंद्रात 50 प्रशिक्षणार्थींना त्यांच्या व्यवसाय व नोकरीस अनुसरून जर्मन भाषा अवगत करून दिली जाणार आहे. या प्रत्येक प्रशिक्षण केंद्राला दीड लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय महाविद्यालयाला दिले जाणार आहे.
advertisement
आता आपल्या घरात बसूनच पाहा नाटक, तेही मोफत! पुण्यात कलाकारच येत आहेत घरी
या क्षेत्रात नोकरीची संधी
आरोग्य, हॉटेल व्यवसाय या क्षेत्रासह इलेक्ट्रिशियन, सुरक्षारक्षक, चित्रकार, सुतार, टपाल सेवा, पॅकर्स आणि मूव्हर्स, विमानतळ, बांधकाम मिस्तरी, प्लंबर, विक्री सहायक, वाहन दुरुस्तीसाठी यांत्रिकी, वेअर हाऊस आणि अवजड वाहनचालक आदी कुशल मनुष्यबळाचा पुरवठा जर्मनीला करण्यात येत आहे. परिचारिका, प्रयोगशाळा सहायक, रेडिओलॉजी सहायक, दंत सहायक, आजारी आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारे, फिजिओथेरपिस्ट, रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट, स्वयंपाकी, हॉटेल व्यवस्थापक, लेखापाल अशा विविध पदांसाठी ही भरती होत आहे.
दुष्काळी गावात मक्याची कमाल; एकरी 60 क्विंटल माल, 4 महिन्यात शेतकरी मालामाल!
असं नोंदवा नाव
ठाणे जिल्ह्यातील पाच केंद्रांपैकी ठाणे शहर परिसरातील दोन महाविद्यालयांसह बदलापूर, नवी मुंबई आणि कल्याण येथे प्रत्येकी एका महाविद्यालयात जर्मन भाषेचे प्रशिक्षण केंद्र आहे. विविध व्यवसायात व तंत्रज्ञानात पारंगत असलेल्या इच्छुक कुशल कामगार, अधिकाऱ्यांनी शासनाने दिलेल्या क्यूआर कोडव्दारे नाव नोंदविण्याचे आवाहन केले आहे.