ठाणे: आपल्या मुलांनी जागतिकीकरणाच्या स्पर्धेत वाऱ्याच्या वेगात धावायला हवं, सर्वात पुढे असायला हवं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यासाठी हल्ली मुलांना अक्षरओळखही इंग्रजी भाषेतून करून दिली जाते आणि घरातही इंग्रजीचाच सर्रास वापर केला जातो. त्यामुळे मराठी असूनही मराठीशी आपले नाते आता तुटत चालले आहे. कारण मराठी भाषा ही भविष्यात आपल्याला उदर्निवाहाला पुरेशी ठरणार नाही, त्याऐवजी इंग्रजी आणि इतर विषयांच्या वाटा निवडल्या तर आपले करियर चांगले घडेल असा एक गैरसमज लोकांच्या मनात रूढ झाला आहे. पण खरेच असे आहे का? हेही पडताळून पाहणे गरजेचे आहे. म्हणूनच मराठी भाषेत करियरच्या संधी नाहीत, की आहेत? हा प्रश्न प्रत्येकाला पडायला हवा. कारण याचे उत्तर आहे.. हो.. ‘मराठी’ मध्ये करियरच्या प्रचंड संधी आहेत पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.
advertisement
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात, मराठी भाषेची महत्त्वपूर्णता आणि स्थान कधीही कमी झालेलं नाही. मराठी भाषेचा उपयोग केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतात आणि विदेशातही वाढत आहे. त्यामुळे मराठी भाषा शिकून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. विशेषत: मीडिया, शिक्षण, व्यवसाय, ग्राहक सेवा आणि सरकारच्या विविध खात्यांमध्ये मराठी भाषेची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. विविध सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये मराठी भाषेची प्रावीण्य असलेल्या व्यक्तीला अनेक नोकऱ्यांसाठी प्राधान्य दिलं जातं. याविषयीची अधिक माहिती भाषाभ्यासक कौशिक लेले यांनी लोकल18 सोबत बोलताना दिलीये.
वडिलांचं अकाली निधन, शाळा सोडली अन् सुरू केलं रंगकाम, कसं उभारलं कवितांचं घर?
आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमध्ये संधी
अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मराठी भाषकांना कॉल सेंटर, ग्राहक सेवा, ट्रांसलेशन, कंटेंट लेखन आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध होतात. अनेक आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमध्ये माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी उत्तम मराठी वाचणारे आणि बोलणाऱ्या लोकांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात विशेष संधी
मराठी भाषेचा वापर शालेय शिक्षण, तंत्रज्ञान, पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातही महत्त्वपूर्ण ठरतो. विशेषत: मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षक, शालेय प्रशासन, पुस्तक लेखन यासाठी अनेक संधी तयार होतात. अनेक शालेय शिक्षण संस्था, कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज मध्ये मराठी भाषेचे शिक्षक आणि सहायक कर्मचारी म्हणून नोकऱ्या उपलब्ध असतात.
तंत्रज्ञान क्षेत्रात विशेष संधी
तंत्रज्ञान क्षेत्रातील बऱ्याच कंपन्या ज्या वेळी विविध भाषांमध्ये सॉफ्टवेअर तयार करतात, तेव्हा मराठी भाषेतील उपयोगिता महत्त्वाची ठरते. बऱ्याच वेळा व्हॉइस रिकग्निशन, ट्रान्सलेशन आणि इतर सॉफ्टवेअर मध्ये मराठी भाषेची आवश्यकता असते.
मराठी भाषा गौरव दिन: कवी दासू वैद्य यांनी ‘खोडरबर’मधून दिला खास संदेश
पत्रकारिता क्षेत्रात विशेष संधी
मुक्त पत्रकारिता /फ्रीलान्स जर्नालिझम, लेख, कॉलम रायटिंग, संशोधन, मराठी भाषेतील कंटेंट रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, ट्रान्सलेशन यामध्येही मराठी भाषेमध्ये चांगलं करिअर करू शकतो. सध्या मोबाईल जर्नलिझमला वेग आल्यामुळे तुम्ही उत्तम मराठी लिहीत असाल आणि बोलत असाल तर मराठी भाषिक चैनल मध्ये तुम्ही काम करू शकता.
सूत्रसंचालन करण्याची संधी
निवेदन आणि सूत्रसंचालन विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे अँकरिंग / स्टोरीटेलिंग या क्षेत्रातही तुम्ही आजमावून पाहू शकता. सध्या मराठी भाषेत अँकरिंग करणारे आणि स्टोरी टेलिंग करणारे अनेक लोक यशस्वी होत आहेत. Youtube आणि पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हीही स्वतःचे चॅनेल सुरू करून मराठी श्रोत्यांना तुमच्याकडे वळवू शकता.
'भाषेत अनेक संधी उपलब्ध आहेत. आता वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण सुद्धा मराठी भाषेत करण्यात येणार आहे, त्यामुळे त्याचा अनुवाद करण्यासाठी सुद्धा मराठी येणाऱ्यांची आवश्यकता आहे. इतर देशातले नागरिक ज्याप्रमाणे आत्मभिमानाने स्वतःची भाषा न लाजता शिकतात आणि बोलतात त्याप्रमाणे आपण आपल्या भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. तरच ती पुढे जाईल.'असे कौशिक लेले यांनी सांगितले.