TRENDING:

Police Bharti: तुमचंही खाकी वर्दीचं स्वप्न साकार होणार, पोलीस भरतीसाठी लक्षात ठेवा 5 ट्रिक्स! 

Last Updated:

Police Bharti 2025: पोलीसाची खाकी वर्दी अंगावर चढवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. लवकरच पोलीस भरती होत असून त्यासाठी 5 फायद्याच्या ट्रिक्स जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
advertisement

छत्रपती संभाजीनगर: पोलीस होऊन अंगावर खाकी वर्दी चढण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. त्यासाठी ते अथक प्रयत्न देखील करत असतात. आता लवकरच पोलीस भरती होणार आहे. त्यामुळे अनेकजण आतापासूनच तयारीला लागले आहेत. पोलीस होण्यासाठी मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेची तयारी नियोजनबद्ध पद्धतीनं करणं गरजेचं असतं. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील 1500 हून अधिक तरुणांना पोलीस घडवणारे शिक्षक सुरेश सोनावणे यांनी माहिती दिलीये. तसेच लोकल18 सोबत बोलताना पोलीस बनण्यासाठीच्या 5 ट्रिक्स सांगितल्या आहेत.

advertisement

कुठं हिंदू-मुस्लिम करताय? सोलापूरची ही घटना पाहा, आपल्या ऐक्याचा वाटेल अभिमान!

पोलीस होण्यासाठी 5 ट्रिक्स

  1. 1. अभ्यासाचे नियोजन करा: परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा नीट अभ्यास करा आणि त्यानुसार वेळापत्रक तयार करा. सामान्य ज्ञान, गणित, तर्कशास्त्र आणि मराठी भाषा यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करा.
  2. 2. शारीरिक तंदुरुस्ती सुधारा: पोलीस भरतीमध्ये शारीरिक चाचणी खूप महत्त्वाची असते. धावणे, उंच उडी, लांब उडी आणि व्यायाम यासाठी नियमित सराव करा. स्टॅमिना आणि ताकद वाढवण्यावर भर द्या.
  3. advertisement

  4. 3. मागील वर्षांचे पेपर सोडवा: मागील परीक्षांचे प्रश्नपत्रिका सोडवून परीक्षेचा पॅटर्न आणि प्रश्नांचा प्रकार समजून घ्या. यामुळे वेळेचे व्यवस्थापन आणि आत्मविश्वास वाढेल.
  5. 4. चालू घडामोडींची माहिती ठेवा: दररोज वृत्तपत्रे वाचा आणि चालू घडामोडी, सरकारी योजना, कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित माहिती अद्ययावत ठेवा. याचा उपयोग लेखी परीक्षेत होईल.
  6. 5. सराव आणि संयम ठेवा: नियमित मॉक टेस्ट द्या आणि आपल्या चुका सुधारा. तयारीदरम्यान संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
  7. advertisement

या पद्धतीने जर तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास केला तर नक्कीच तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार होईल, असं सुरेश सोनावणे सांगतात.

मराठी बातम्या/करिअर/
Police Bharti: तुमचंही खाकी वर्दीचं स्वप्न साकार होणार, पोलीस भरतीसाठी लक्षात ठेवा 5 ट्रिक्स! 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल