मूळचे सातारा जिल्ह्यातील असलेले माजी सैनिक समाधान देशमुख यांनी सांगितलं की, समाजाचं काहीतरी देणं लागतो, या भावनेतून ही योजना सुरू करण्यात आली. त्यांनी 17 वर्षे आर्मीत सेवा केल्यानंतर 2018 मध्ये निवृत्ती घेतली आणि त्यानंतर जय जवान करिअर अकॅडमीची स्थापना धनकवडी याठिकाणी केली. जाधव यांनी सांगितलं की, अकॅडमी सुरू केल्यानंतर माजी सैनिकांसाठी काहीतरी करावं अशी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी घोषणा केली की, माजी सैनिकांना पोलीस भरतीचे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिलं जाईल. सध्या या उपक्रमाचा लाभ 50 पेक्षा अधिक माजी सैनिक घेत आहेत.
advertisement
अकॅडमीमध्ये मुलींसाठी अनेक सोयी-सुविधा
पहिल्या भरतीत अकॅडमीनं चांगलं यश मिळवलं होतं. त्यावेळी 35 उमेदवारांची पोलीस दलात निवड झाली होती. त्यानंतरही हा यशाचा प्रवास सुरू राहिला. 2023-24 च्या पोलीस भरतीत अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अलीकडील आर्मी भरतीतही काही विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
अकॅडमीत मुलींसाठी वेगळ्या सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या ऍडमिशन घेतलेल्या काही मुलींना मोफत प्रशिक्षण दिलं जातं. तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही इथे मोफत प्रशिक्षणाची संधी दिली जाते.





