मेळाव्यात 24 कंपन्यांचा सहभाग
या रोजगार मेळाव्यात तरुणांसाठी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील सुमारे 24 कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवला आहे. या कंपन्यांकडून जवळपास 1900 पेक्षा जास्त रिक्त पदे भरली जाणार आहेत. ही पदे 10 वी, 12 वी, डिप्लोमा तसेच पदवीधर पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.
advertisement
पुणे जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना या मेळाव्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. जास्तीत जास्त बेरोजगार आणि नोकरी इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांबाबत अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. खाजगी क्षेत्रातील विविध पदांसाठी या मेळाव्यात प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नोकरी इच्छुकांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुलाखतीस येताना उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती तसेच आवश्यक अर्ज सोबत आणावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे (रास्ता पेठ) येथे प्रत्यक्ष भेट देऊन किंवा 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती संबंधित कार्यालयाकडून देण्यात आली आहे.






