राज्यातील सर्व माध्यमिक शाळांना फेब्रुवारी-मार्च 2025 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ही प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात आली असून सोमवार, दि. 20 जानेवारी 2025 पासून अॅडमिट कार्ड या लिंकद्वारे ती डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. याबाबत तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांना विभागीय मंडळाकडे संपर्क साधन्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
advertisement
ई-चलन भरलं का? वाहतूक पोलीस अॅक्शन मोडवर, आता थेट गाडीच जप्त होणार
कसं मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट?
राज्यातील सर्व विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळांनी फेब्रुवारी-मार्च 2025 च्या 10 वीच्या बोर्ड परीक्षेसाठी प्रवेशपत्र प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत.
हॉल तिकीट ऑनलाईन प्रिटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्याकांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी केली जाईल.
ज्या आवेदनपत्रांना ‘Paid’ असे Status प्राप्त झालेले आहे त्यांचीच प्रवेशपत्रे ‘Paid Status Admit Card’ या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.
अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या आणि विभागीय मंडळामार्फत Extra Seat No दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ‘Extra Seat No Admit Card’ या पर्यायानद्वारे उपलब्ध होतील.
विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र (Hall Ticket) गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्याध्यर्थ्यांना द्यावयाचे आहे.
प्रवेशपत्राबाबत सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतून प्रवेशपत्र घ्यावयाचे आहे.