सुदर्शन चखाले यांनी MSW (Master of Social Work) मधून आपल शिक्षण पूर्ण केलं आहे . सुदर्शन यांचं झोपडपट्टीत बालपण गेल्याने अशा भागातील मुलांच्या प्रश्नांची त्यांना चांगली जान आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी 260 शाळाबाह्य मुलांना पुन्हा शाळेत दाखल केलं आहे. सध्या कर्वेनगर, संभावस्ती, येरवडा, दांडेकर पूल आणि लोहिया नगर परिसरात ते हा उपक्रम राबवत आहेत.
advertisement
पुण्यातील फुटपाथ शाळा! ट्रांसजेंडर आम्रपाली करतायेत मोठं काम, तुम्हीही कराल सलाम, Vide
260 शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल
सुदर्शन चखाले यांनी आत्तापर्यंत 260 शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल केलं आहे. मात्र, अनेक मुलांकडे जन्मदाखला नसल्याने आधार कार्ड मिळत नाही आणि त्यामुळे शाळेत प्रवेश मिळवणं कठीण होतं. या समुदायाला आजही नागरिकत्वाच्या हक्कांसाठी झगडावं लागत असून सरकारने यावर तातडीने उपाययोजना करायला हव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ज्योतिबा सावित्रीबाई फाउंडेशन आणि इकोनेट या संस्थांच्या माध्यमातून त्यांचा हा उपक्रम राबवला जातो. चखाले यांचं मुख्य काम भटक्या-विमुक्त समाज, विशेषतः पारधी वस्त्यांमध्ये आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज अनेक शाळाबाह्य मुलं नियमितपणे शाळेत जाऊ लागली आहेत.