बारावीनंतर कुठल्या विषयात करिअर करावं किंवा कुठल्या शाखेमध्ये अॅडमिशन घ्यावं असा प्रश्न हा असतोच. विशेष करून मुलींसाठी तर त्यासाठी होम सायन्स हा एक बेस्ट असा पर्याय आहे. होम सायन्समध्ये अॅडमिशन घेतल्यानंतर भरपूर अशा नोकरीच्या संधी आहेतच पण त्यासोबतच स्वतःचा व्यवसाय देखील यात आपण सुरू करू शकतो. यामध्ये तुम्ही कुकिंग त्यासोबतच फॅशन डिझायनिंग, डायटीशियन, रांगोळी तसंच एम्ब्रॉयडरी अशी विविध कोर्सेस यामध्ये उपलब्ध आहेत.
advertisement
हे सर्व कोर्सेस जर कोणी केले तर त्यानंतर ते कुठेही नोकरीला लागू शकतात किंवा स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात. सध्या डायटेशनला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. जर तुम्ही डायटेशनचा कोर्स केला तर तुम्ही कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये डायटिशियन म्हणून काम करू शकतात किंवा तुम्ही स्वतःचे वैयक्तिक देखील सुरू करू शकता.
तसंच एम्ब्रॉयडरीला खूप मागणी आहे. जर एम्ब्रॉयडरीचे क्लासेस केले तर यामधून तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता आणि तुम्ही चांगली कमाई देखील करू शकता. तर भरपूर अशा संधी या होम सायन्समध्ये आहेत आणि जर तुम्ही यामधून करिअर केलं तर तुम्हाला नक्कीच चांगली नोकरी लागू शकते किंवा तुम्ही व्यवसाय देखील सुरू करू शकता. होम सायन्स हे फक्त मुलींसाठी नसून मुलं देखील यामध्ये अॅडमिशन घेऊन काहीतरी वेगळं किंवा कोर्स करून स्वतःच सुरू करू शकतात, असं प्राध्यापक दिपाली जाधव यांनी सांगितले आहे.