71 वर्षांची ही महिला, रुपिंदर कौर असं तिचं नाव, अमेरिकेत राहणारी ती अनिवासी भारतीय. इंग्लंडमध्ये राहणारा 75 वर्षांचा अनिवासी भारतीय चरणजीत सिंह ग्रेवालच्या प्रेमात ती पडली. त्याच्याशी लग्न करण्यासाठी ती अमेरिकेच्या सिएटलहून भारतात पंजाबच्या लुधियानात आली. पण काही दिवसांनंतर ती बेपत्ता होती. त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
14 वर्षांची मुलगी झोपून उठली आणि मारला लकवा, डॉक्टरांनीही हार मानली पण 3 महिन्यांनी घडला चमत्कार
advertisement
रुपिंदरची बहीण कमल कौर खैरला 24 जुलैला तिचा मोबाईल बंद असल्याने संशय आला. तिने 28 जुलैला दिल्लीतील अमेरिकी दूतावासाला याबाबत सांगितलं आणि तिथं मदत मागितली. जिथून स्थानिक पोलिसांना तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर गेल्याच आठवड्यात त्यांना रुपिंदरचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.
मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांनी या प्रकरणात सुखजीत सिंह सोनू नावाच्या व्यक्तीला अटक केली. ज्याने रुपिंदरची घरात हत्या करून मृतदेह स्टोअररूममध्ये जाळल्याची कबुली दिली. यावर्षी जुलैमध्ये तिची हत्या करण्यात आली. सोनूने ग्रेवालच्या आदेशानुसार हत्या केल्याचं सांगितलं. यासाठी त्याने त्याला 50 लाख रुपये देण्याचं वचन दिलं होतं.
हॉटेल रूममध्ये गेलात तर चुकूनही आधी लाइट ऑन करू नका, तज्ज्ञांनी का दिला असा सल्ला?
हत्येचं कारण पैसे असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. रुपिंदरने भारतात येण्याआधी ग्रेवालला बरेच पैसे पाठवले होते. हे पैसे हडप करण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणात चरणजीत सिंग ग्रेवालवरही आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांचं एक पथक सध्या त्याचा शोध घेत आहे.