TRENDING:

'अशी बायको नको गं बाई...' महिलेनं नवऱ्याला अशा कारणामुळे संपवलं, कारण ऐकाल तर संतापाल

Last Updated:

महिलेने आपल्या पतीला विष देऊन ठार केलं. मात्र पोलिसांना आणि गावकऱ्यांना तिनं सांगितलं की पतीचा मृत्यू हा जंगली प्राण्याच्या (वाघ/बिबट्या) हल्ल्यामुळे झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतात अनेकदा अशा घटना घडतात की ज्यावर विश्वास ठेवणं अवघड जातं. एखाद्या अपघात, प्राण्याचा हल्ला किंवा अन्य कारणांमुळे कुटुंबाला सरकारकडून नुकसानभरपाई मिळते. मात्र, या भरपाईसाठी काही लोक किती टोकाला जाऊ शकतात, याचं ताजं उदाहरण कर्नाटकमध्ये समोर आलं आहे. इथे एका पत्नीने पतीला संपवून टाकलं आणि त्यानंतर बिबट्या (किंवा वाघ) हल्ल्याची बनावट कथा रचली. कारण एवढंच की यामुळे सरकारी नुकसानभरपाई मिळेल.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

नेमकं प्रकरण काय?

ही धक्कादायक घटना मैसूर जिल्ह्यातील हुनसुर तालुक्यातल्या चिक्काहेज्जुर गावात घडली. इथे सल्लापुरी नावाच्या महिलेने आपल्या पतीला विष देऊन ठार केलं. मात्र पोलिसांना आणि गावकऱ्यांना तिनं सांगितलं की पतीचा मृत्यू हा जंगली प्राण्याच्या (वाघ/बिबट्या) हल्ल्यामुळे झाला आहे. एवढंच नव्हे तर तिनं असा दावा केला की तिचा पती हरवला आहे आणि कदाचित वाघ त्याला उचलून नेऊन ठार करून जंगलात फेकून दिला असावा.

advertisement

महिलेच्या या दाव्यानंतर पोलिस आणि वन विभागाने संयुक्त शोधमोहीम राबवली. मात्र पती वेंकटस्वामी जिथे शेवटचा दिसला होता तिथे कोणतंही प्राण्याच्या हल्ल्याचं चिन्ह आढळलं नाही. शेवटी पोलिसांनी मृतकाच्या घराची तपासणी केली असता, घराच्या मागे गवतात, गोबराच्या ढिगाऱ्याखाली त्यांना लपवलेलं त्याचं प्रेत सापडलं.

कठोर चौकशीनंतर पत्नीने धक्कादायक कबुली दिली. तिनं सांगितलं की जंगलातील प्राण्यांच्या हल्ल्यात मरणाऱ्यांना सरकारकडून तब्बल 15 लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळते. याच लोभातून तिनं खूनाचा कट रचला. सुपारीच्या बागेत काम करत असताना तिला गावकऱ्यांची चर्चा ऐकली होती की अशा प्रकरणात मोठं नुकसानभरपाईचं पॅकेज मिळतं. त्यानंतरच तिनं ही भयानक योजना आखली.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
'अशी बायको नको गं बाई...' महिलेनं नवऱ्याला अशा कारणामुळे संपवलं, कारण ऐकाल तर संतापाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल