वाराणसीच्या काशीमध्ये ही हादरवून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेतील बार मालक राजेंद्र गुप्ता हा गेल्या काही दिवसांपासून एका मांत्रिकाच्या संपर्कात होता. या मांत्रिकाच्याच नादी लागून राजेंद्र गुप्ता यांनी साखर झोपेतच आपलं संपूर्ण कुटुंब संपवलं होतं. मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांचं संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत होते. याचवेळी गुप्ता यांनी बायको, दोन मुलं आणि एका मुलीवर गोळी झाडून त्यांची हत्या केली.या हत्येनंतर गुप्ता यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
advertisement
या घटनेनंतर गुप्ता कुटुंबियांच्या घरात दुपारच्या सुमारास त्यांची मोलकरीण आली होती. ही मोलकरीण घरात आल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला होता. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी तत्काळ घरात पोहोचून तपास सूरू केला होता. पोलिसांनी यावेळी घरातून राजेंद्र गुप्ता यांची बायको नीतू गुप्ता (४२), मुलगा नवनेंद्र (२०) आणि एक अल्पवयीन मुलगा आणि मुलगी यांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले होते.
या घटनेत कुटुंबियांच्या हत्या करणारे बार मालक राजेंद्र गुप्ता यांनी सुद्धा आत्महत्या केली होती. मात्र त्याचा मृतदेह काही पोलिसांच्या हाती लागला नव्हता. मात्र ८ तासानंतर एका गावातील घरात आढळला होता.
'या' कारणामुळे रचला कुटुंबियांच्या हत्येचा कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र गुप्ता हे एका मांत्रिकाच्या संपर्कात होते. या मांत्रिकाने गुप्ता यांना त्यांच्या यशाच्या मार्गात बायको आणि मुलं येत असल्याची माहिती दिली होती. याच कारणामुळे राजेंद्र गुप्ता यांनी त्यांचं हसतं खेळत कुटुंब संपवलं होतं. या घटनेनंतर आता पोलिसांनी मांत्रिकाचा शोध सूरू केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
