TRENDING:

बाप्पाचं दर्शन घेतलं, परत येताना काळाने गाठलं; ट्रकच्या धडकेत दुचाकीचा चुराडा, बाप-लेकीचा मृत्यू

Last Updated:

डोहळे गावाच्या हद्दीत साईधाम लॉजिस्टिकसमोर मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नरेश पाटील, प्रतिनिधी
Bhiwandi Accident
Bhiwandi Accident
advertisement

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील डोहळे गावाजवळ शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू झाला. मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात राजेश अधिकारी (वय 39) आणि त्यांची मुलगी वेदिका अधिकारी (वय 11) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या अधिकारी पिता-पुत्री भिवंडी तालुक्यातील सापे गावातील नातेवाईकांकडे देवदर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून हे दोघे दुचाकीवरून घरी परतत असताना डोहळे गावाच्या हद्दीत साईधाम लॉजिस्टिकसमोर मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की दोघेही रस्त्यावर दूर फेकले गेले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलवले.

advertisement

गावात शोककळा

या अपघातामुळे शहापूर तालुक्यातील सरलांबे गावात शोककळा पसरली आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहाच्या वातावरणात अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिकारी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.

प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी

दरम्यान, ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पडघा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. महामार्गावरील बेदरकार वाहनचालकांमुळे वाढत्या अपघातांच्या घटना गंभीर स्वरूप धारण करत असून स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.

advertisement

वाहतूक विस्कळीत

अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पडघा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणली.

महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पडघा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. ट्रकचालक फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने पुन्हा एकदा महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

advertisement

हे ही वाचा :

शहापूर पोलिसांचा 'अजब' कारनामा, मृत व्यक्तीच्या नावे काढली हद्दपारीची नोटीस, वाचा सविस्तर

एकुलता एक मुलगा घरी आलाच नाही! भिवंडीच्या रस्त्यावर रुग्णवाहिका आडवी लावून सगळेच रडले 

मराठी बातम्या/क्राइम/
बाप्पाचं दर्शन घेतलं, परत येताना काळाने गाठलं; ट्रकच्या धडकेत दुचाकीचा चुराडा, बाप-लेकीचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल