प्राणीशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवूनही मातीशी असलेलं नातं न सोडता योगेश यांनी गेल्या काही वर्षांपासून विषमुक्त शेती सुरू केली. अर्ध्या एकरावर त्यांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला. गहू, हरभरा, लसूण, घेवडा आणि विशेषतः कर्टूले या हंगामी पिकांची लागवड त्यांनी केली. मात्र, बाजारपेठेत सेंद्रिय मालाला रासायनिक पिकांसारखाच भाव मिळत असल्याने त्यांना या शेतीतून योग्य परतावा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी थेट विक्रीचा निर्णय घेतला.
advertisement
AI चा वापर करून कशी करावी शेती? शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? संपूर्ण माहितीचा Video
गेल्या दोन वर्षांपासून योगेश स्वतः आठवड्याच्या शेवटी कोथरूड येथील गांधीभवन परिसरात शेतमाल घेऊन जातात. ग्राहकांना शेतातून आलेल्या ताज्या भाज्या थेट मिळाव्यात, यासाठी ते स्वतः दर ठरवतात आणि माल विकतात. शेतकरीच दर ठरवणार आणि ग्राहकांना खात्रीशीर ताजं अन्न मिळणार, हा त्यांचा विश्वास आहे. उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक ग्राहक चव्हाण यांना स्वतः शोधून शेतमाल खरेदी करतात. शेतातला ताजा माल ताटात आणण्याचा प्रयत्न करत आहे. ग्राहकांनाही हे पटतंय, असे योगेश सांगतात.
कर्टूले हे त्यांच्या शेतीतील महत्त्वाचे पीक आहे. अर्ध्या एकरात ते 400 ते 450 किलो कर्टूले काढतात. या पिकातून साधारण दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. या पिकाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे खर्च कमी होतो आणि एकदा लावलेले कंद सलग 8 वर्षांपर्यंत टिकतात. साधारण तीन महिन्यांचा हंगाम असलेले हे पीक 5 ते 6 महिन्यांपर्यंत विक्रीसाठी राहते.