कमल नागरकोटी असं आत्महत्या करणाऱ्या ३१ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो नैनितालचे भाजप जिल्हा पदाधिकारी बिशन नागरकोटी यांचा मुलगा आहे. कमल याचा कोटाबाग येथे पोलिसांशी कथित वाद झाला होता. यानंतर त्याने विष प्राशन करून आयुष्य संपवलं. कमल नागरकोटी हा आपले वडील बिशन नागरकोटी यांच्यासोबत व्यावसायात काम करत होता.
त्याच्या कुटुंबाने आरोप केला आहे की, त्याने शुक्रवारी कोटाबाग बाजार परिसरात गेला होता. यावेळी नियमित वाहन तपासणीदरम्यान एका हवालदाराने त्याला मारहाण केली आणि अपमानित केले. कमलला काहीही कारण नसताना मारहाण करण्यात आली. तसेच पोलिसाने शिवीगाळ देखील केली. हा अपमान त्याच्या जिव्हारी लागला. ही बाब त्याने लगेचच त्याच्या आईला फोन करून सांगितली. यानंतर विष प्राशन करून जीवन संपवलं," असे एका नातेवाईकाने सांगितले.
advertisement
एसपी प्रकाश चंद्र म्हणाले, "या मारहाण प्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जर कोटाबाग चौकीचे प्रभारी प्रवीण सिंग तेवतिया आणि कॉन्स्टेबल परमजीत यांच्यासह कोणताही अधिकारी दोषी आढळला तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. अधिकाऱ्यांनी शोकाकुल कुटुंबाला ५ लाख रुपये भरपाई देण्याची शिफारसही केली आहे." या घटनेमुळे कोटाबाग परिसरात शनिवारी लोकांनी संताप व्यक्त झाला. स्थानिकांनी कालाधुंगी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली. निदर्शकांनी आरोपीला बडतर्फ करण्याची आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.