मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी रोहित नेगी हे आपल्या अन्य एका मित्राच्या घरी जेवण करायला गेले होते. जेवण झाल्यानंतर घरी परतत असताना वाटेत क्रॉसिंगवर लपून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ज्यात रोहित नेगी यांचा जागीच मृत्यू झाला.
या हत्येच्या काही तास आधी मयत रोहित नेगी आणि मुख्य आरोपीमध्ये फोनवरून वाद झाला होता. रोहितच्या एका मित्राचं दुसऱ्या समुदायातील मुलीशी मैत्री होती. याच कारणातून रोहित आणि आरोपींचा वाद झाला. दोघांचं फोनवर भांडण झालं, दोघांनी एकमेकांना धमकावत शिवीगाळ केली. फोन ठेवल्यानंतर वाद मिटला असावा, असं रोहितला आणि त्याच्या मित्रांना वाटलं. पण या वादानंतर अवघ्या काही तासांत रोहितची हत्या झाली.
advertisement
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रोहित नेगी आणि त्याचे सहा मित्र दोन कारमध्ये बसून एका मित्राच्या घरी जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर घरी परत येत असताना रोहित स्वत: गाडी चालवत होता. यावेळी मुझफ्फरनगरचा रहिवासी अझहर त्यागी आणि त्याचा एक साथीदार समोर आले. त्यांनी काही कळायच्या आत रोहितवर गोळीबार केला. रोहित नेगीचा मित्र अभिषेक बर्टवाल हा समोरच्या सीटवर होता, त्याच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. देहरादून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.