तक्रारदार महिला भावसिंगपुरा भागात आपल्या मुलासोबत वास्तव्यास आहे. तिचे 2014 मध्ये लग्न झाले असून पतीशी झालेल्या वादानंतर सध्या न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी पतीने एक मुलगा स्वतःकडे ठेवला होता, तर मोठा मुलगा आईकडेच राहत होता. मात्र, याच मोठ्या मुलाला आता बळजबरीने पळवून नेण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे.
advertisement
आम्हाला शोधू नका..., आईवडिलांचा वाद अन् मुलांचं टोकाचं पाऊल, संभाजीनगरच्या घटनेनं पोलीसही चक्रावले!
27 जानेवारी रोजी दुपारी 12:10 वाजताच्या सुमारास हा अल्पवयीन मुलगा औरंगपुरा भागातील शाळेत गेला होता. मात्र, नेहमीप्रमाणे तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. घटनेनंतर बुधवारी शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये (एमएच 20 एचएच 2015) क्रमांकाची कार स्पष्टपणे दिसून आली असून, त्यामध्ये पतीचे तीन जवळचे मित्र असल्याचे आढळले.
दरम्यान, पतीच्या सांगण्यावरूनच या तिघांनी मुलाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी पतीसह त्याच्या मित्रांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे.






