TRENDING:

Chaitanya Anand : बेबी I Love You, जवळ ये ना.. विद्यार्थीनीला मेसेज करणाऱ्या चैतन्यानंदचं शेवटचं लोकेशन आलं समोर...

Last Updated:

Delhi Ashram Chaitanya Anand Saraswati Case: 17 विद्यार्थिनींचे शारीरिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप असलेला स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ ​​पार्थ सारथी अद्याप फरार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Delhi Ashram molestation case Police gots leads in Chaitanya Anand Saraswati last location
Delhi Ashram molestation case Police gots leads in Chaitanya Anand Saraswati last location
advertisement

नवी दिल्ली: दिल्लीतील एका खाजगी व्यवस्थापन महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. 17 विद्यार्थिनींचे शारीरिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप असलेल स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ ​​पार्थ सारथी अद्याप फरार आहेत. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता त्याच्या शेवटच्या लोकेशनबाबतची माहिती समोर आली आहे.

advertisement

"बेबी, आय लव्ह यू" असे मेसेज

एफआयआरमध्ये नोंदवलेल्या विद्यार्थिनींचा जबाब धक्कादायक आहे. 62 वर्षीय स्वामी चैतन्यनंद सरस्वती रात्री उशिरा महिला विद्यार्थिनींना त्यांच्या खोलीत बोलावत असत आणि त्यांना विचित्र संदेश पाठवत असत. मध्यरात्रीनंतर तो वारंवार "बेबी, आय लव्ह यू, आय लव्ह यू," "तू आज खूप सुंदर दिसतेस," आणि "माझ्या जवळ ये" असे मेसेज पाठवत असे. जेव्हा विद्यार्थिनींनी नकार दिला तेव्हा तो प्राध्यापकांशी हस्तक्षेप करून त्यांच्यावर दबाव आणत असे, अशी तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतरही प्रतिसाद न दिल्यास चैतन्यानंद सरस्वती हा मुलींना वर्गातील अनुपस्थिती कमी दाखवण्याची अथवा परीक्षेत कमी गुण देण्याची धमकी देत असे.

advertisement

जर त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर त्यांची उपस्थिती कमी दाखवण्याची धमकी दिली जात असल्याचे विद्यार्थीनींनी एफआयआरमध्ये म्हटले. एका विद्यार्थिनीने म्हटले आहे की, तिच्या पायाचे बोट फ्रॅक्चर झाल्यानंतर आणि एक्स-रे रिपोर्ट व्हॉट्सअॅपवर स्वामी चैतन्यनंद यांना पाठवल्यानंतर, तो "तुम्ही आज खूप सुंदर दिसत" असा मेसेज केला. एका वृत्तसंस्थेनुसार, एफआयआरमध्ये एका घटनेचा उल्लेख आहे. होळीच्या दिवशी, स्वामी चैतन्यनंद याने विद्यार्थिनींना एका रांगेत उभे केले आणि त्यांना "हरि ओम" म्हणत त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कपाळावर आणि गालावर रंग लावला. एका विद्यार्थीनीने आरोप केला की या काळात त्याने तिला जबरदस्तीने स्पर्श केला आणि वारंवार तिला "बेबी" म्हटले.

advertisement

सीसीटीव्हीवरून पाहायचा मुलींना...

स्वामी चैतन्यनंदांचा प्रभाव संस्था आणि वसतिगृहात इतका प्रबळ होता की तो विद्यार्थिनींच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत असे. तो वसतिगृहाच्या लॉबीमध्ये आणि बाथरूमच्या बाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लाईव्ह फुटेज त्याच्या मोबाईल फोनवर पाहत असे. या वसतिगृहात आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील सुमारे 75 विद्यार्थिनी राहतात.

advertisement

शेवटचं लोकेशन कुठं?

विद्यार्थींनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.  चैतन्यनंद हा अज्ञात ठिकाणी पसार झाला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, त्याचे शेवटचे ठिकाण मुंबईमध्ये सापडले आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची काही पथके आता छापे टाकत आहेत. त्याला देशाबाहेर पळून जाण्यापासून रोखण्यासाठी लूकआउट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
Chaitanya Anand : बेबी I Love You, जवळ ये ना.. विद्यार्थीनीला मेसेज करणाऱ्या चैतन्यानंदचं शेवटचं लोकेशन आलं समोर...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल