काय घडले नेमके?
जैंत परिसरातील परखम गुर्जर गावातील रहिवासी चंद्रपाल आपल्या जावयाच्या मृत्यूनंतर त्याच्या विम्याची कागदपत्रे घेण्यासाठी गुरुवारी सबलगड येथे गेले होते. त्यांचा जावई लोकेशने एका महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. चंद्रपाल आपल्या मुलीच्या मदतीने विम्याची कागदपत्रे घेण्यासाठी आले असता त्याचा मोठा जावई सुनील आणि सासू कमलेश कुमारी तिथे आले.
मुंबईतील सर्वात महागडा खरेदी व्यवहार, ऐतिहासिक बंगल्याची 276 कोटींना विक्री
advertisement
प्राणघातक हल्ला
सुनील आणि कमलेश कुमारी यांनी चंद्रपाल यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली आणि त्यांच्याशी उद्धट वर्तन केले. चंद्रपाल यांनी त्यांना विरोध केला असता सुनील आणि कमलेश कुमारी यांनी त्यांच्यावर धारदार ‘बांका’ (चारा कापण्यासाठी वापरला जाणारा धारदार शस्त्र) ने हल्ला केला. त्यांना सतत मारहाण केली. या मारहाणीत ते रक्तबंबाळ होऊन कोसळले.
चंद्रपाल गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर पडले होते. घरच्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
मुंबई Airport वर झालं चेकिंग, Condom मध्ये ठेवले होते सर्वात धोकादायक लिक्विड
पोलिसांनी आरोपींना अटक केली
चंद्रपाल यांच्या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी सुनील आणि कमलेश कुमारी यांना अटक केली. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथक पाठवले असून, सर्व पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.