मुंबई Airport वर झालं चेकिंग, Condom मध्ये ठेवले होते सर्वात धोकादायक लिक्विड; अधिकाऱ्यांची झोप उडाली
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Liquid Cocaine In Mumbai: मुंबई विमानतळावर DRI च्या मोठ्या कारवाईत परदेशी नागरिकाकडून तब्बल ११ कोटींची लिक्विड कोकेन जप्त करण्यात आली. धक्कादायक म्हणजे ही कोकेन कंडोममध्ये लपवून भारतात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
मुंबई : मुंबई इंटरनॅशनल विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) ने मोठी कारवाई करत ११ कोटी रुपये किमतीची लिक्विड कोकेन जप्त केले आहे. ही कारवाई एका परदेशी नागरिकावर करण्यात आली असून, ही तस्करी आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
DRI ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एका परदेशी नागरिकाकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज असल्याचा संशय होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर कसून तपासणी सुरू केली. संशयित प्रवाशाची तपासणी केली असता, त्याच्या बॅगेत लपवलेली लिक्विड कोकेन सापडली.
लिक्विड कोकेन म्हणजे काय?
लिक्विड कोकेन ही एक अत्यंत धोकादायक ड्रग मानली जाते. पावडर स्वरूपातील कोकेनच्या तुलनेत ते अधिक प्रभावी असते आणि तस्करीसाठी वापरणे सोपे असते. या ड्रग्जला विविध द्रव पदार्थांमध्ये मिसळून सहजपणे एका देशातून दुसऱ्या देशात नेले जाते. परफ्यूम, मद्य किंवा इतर लिक्विड उत्पादनांमध्ये मिसळून याची वाहतूक केली जाते. त्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण ठरते.
advertisement
आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा मोठा कट?
या संपूर्ण घटनेचा तपास सध्या DRI अधिकारी करत आहेत. या ड्रग्सची भारतात वाहतूक कोठून झाली? त्यामागे कोणते मोठे नेटवर्क कार्यरत आहे? हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील काही महिन्यांत भारतात ड्रग तस्करीचे अनेक मोठे प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामुळे या कारवाईमुळे आणखी मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
IPLचा पहिला सामना कोणत्या संघात झाला? IPLच्या ‘पहिल्या’ रेकॉर्ड्सची यादी!
या घटनेनंतर देशभरात विमानतळांवर सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ड्रग तस्करी रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 20, 2025 9:21 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
मुंबई Airport वर झालं चेकिंग, Condom मध्ये ठेवले होते सर्वात धोकादायक लिक्विड; अधिकाऱ्यांची झोप उडाली