सोन्यापेक्षाही मौल्यवान बी! फक्त एक विकली तरी व्हाल करोडपती

Last Updated:

Worlds big heaviest seed :आतापर्यंत तुम्ही कदाचित आंब्यासारख्या फळांपासूनच मोठं बी पाहिलं असेल. पण जगातील सर्वात मोठी बी फक्त एकच विकली तरी तुम्ही करोडपती व्हाल. 

News18
News18
नवी दिल्ली : काही फळं, फुलं आणि भाज्या ज्यांच्या बिया आपण खातो. दुकानातही या बिया विकल्या जातात. काही बिया महाग असतात. पण एखादी बी महागात महाग किती असेल... तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटेल. एक अशी बी जी फक्त एकच विकली तरी तुम्ही करोडपती व्हाल. आता ही बी कोणती हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
आतापर्यंत तुम्ही कदाचित आंब्यासारख्या फळांपासूनच मोठं बी पाहिलं असेल. पण जगातील सर्वात मोठी बी आहे, ज्याचं वजन सरासरी 15-20 किलो असतं. पण विक्रमांमध्ये 18.6 किलोपर्यंत नोंद झाली आहे. काही सोर्सनुसार ते 30 किलोपर्यंतही पोहोचू शकतं. हे बी 40-50 सेमी लांब आणि 18-20 सेमी रुंद असतं. त्यात दोन भाग असतात, एक कठीण कवच आणि आत तंतुमय लगदा. परंतु त्याची खरी ताकद त्याच्या मंद वाढीमध्ये आहे. झाडाला फळं येण्यासाठी 25-50 वर्षे लागतात आणि पूर्ण पिकायला 45 वर्षे लागतात. हे झाड 30-40 मीटर उंचीवर आणि 800 वर्षांपर्यंत जगू शकतं. ऐतिहासिकदृष्ट्या ही बी औषधी गुणधर्मांसाठी, शोभेच्या गुणधर्मांसाठी आणि कथित कामोत्तेजक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे.
advertisement
आता ही बी कोणती हे जाणून घेण्याची तुमची उत्सुकता अधिकच वाढली असेल. जगातील सर्वात रहस्यमय आणि मौल्यवान नैसर्गिक खजिन्यांपैकी एक म्हणजे कोको-डे-मेर, ज्याला समुद्राचा नारळ असंही म्हणतात. ही बी फक्त त्याच्या आकारासाठीच प्रसिद्ध नाही, तर त्याची दुर्मिळता आणि किंमत म्हणजे जणू लॉटरीचं तिकीटचं.
advertisement
सेशेल्स द्वीपसमूहातील वॉलिस आणि प्रॅस्लिन बेटांवर वाढणारं हे ताडाचं झाड (लोडोइसिया मालदिविका) जागतिक जैवविविधतेचे प्रतीक आहे. त्याचा इतिहास खूपच आकर्षक आहे. कोको-डे-मेरचा शोध पोर्तुगीज खलाशांनी सोळाव्या शतकात लावला होता. त्यांनी या प्रचंड तरंगत्या बियांना समुद्राचा खजिना मानलं कारण ते कधीही झाडाशी जोडलेलं पाहिलं नव्हतं. त्यांचा आकार इतका अनोखा आहे की तो स्त्रीच्या नितंबांसारखा दिसतो, ज्यामुळे समुद्र देवीच्या फळासारख्या पौराणिक कथा निर्माण होतात.
advertisement
एकोणिसाव्या शतकात ते इतकं मौल्यवान होतं की समुद्री चाच्यांनी ते लुटलं. जर एखादा शेतकरी किंवा संग्राहक कायदेशीररित्या बियाणं विकू शकला तर ते निश्चितच श्रीमंत होऊ शकतात. आजकाल चांगल्या दर्जाचं कोको-डे-मेर बियाणं 600 ते 1000 डॉलर म्हणजे अंदाजे 50,000-80,000 रुपये मध्ये विकलं जातं. मोठं किंवा दुर्मिळ बियाणं हजारो डॉलर्स मिळवू शकतात. पण याची विक्री बेकायदेशीर आहे.
advertisement
सेशेल्स सरकारने 1980 पासून ते संरक्षित प्रजाती म्हणून घोषित केलं आहे. CITES (संकटग्रस्त प्रजातींमधील आंतरराष्ट्रीय व्यापारावरील करार) अंतर्गत कठोर परवान्याशिवाय त्याची निर्यात करण्यास मनाई आहे. सेशेल्स पार्क्स अँड गार्डन्स अथॉरिटीच अधिकृत विक्री करतात तेही मर्यादित प्रमाणात. पण बेकायदेशीर व्यापार सुरूच आहे, ज्यामुळे झाडाची संख्या कमी होते. सेशेल्समध्ये याची एकूण सुमारे 7000 ते 8000 झाडं आहेत, बहुतेक सरकारी संरक्षित क्षेत्रात आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
सोन्यापेक्षाही मौल्यवान बी! फक्त एक विकली तरी व्हाल करोडपती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement