मुंबईतील ऐतिहासिक बंगल्याची 276 कोटींना विक्री; स्वातंत्र्यसैनिकांसाठी गुप्त ठिकाण, 'आझाद हिंद रेडिओ'चे प्रसारण व्हायचे

Last Updated:

Laxmi Niwas Bungalow sold: मुंबईच्या नेपियन सी रोडवरील ऐतिहासिक लक्ष्मी निवास बंगला तब्बल 276 कोटी रुपयांना विकला गेला आहे. स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या या बंगल्याचा समावेश आता मुंबईतील सर्वात महागड्या संपत्ती व्यवहारांमध्ये झाला आहे. निखिल मेसवानी यांच्या कुटुंबाशी संबंधित वागेश्वरी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने ही ऐतिहासिक वास्तू खरेदी केली आहे. Laxmi Niwas

News18
News18
मुंबई: मुंबईच्या नेपियन सी रोडवरील ऐतिहासिक 'लक्ष्मी निवास' बंगला तब्बल 276 कोटी रुपयांना विकला गेला आहे. हा बंगला भारत छोड़ो आंदोलनाच्या काळात स्वातंत्र्यसैनिकांसाठी गुप्त ठिकाण म्हणून ओळखला जात होता. झॅपकी (Zapkey) या रिअल इस्टेट डेटा फर्मच्या कागदपत्रांनुसार हा बंगला मुंबईतील सर्वात महागड्या संपत्ती खरेदी व्यवहारांपैकी एक ठरला आहे.
स्वातंत्र्यसंग्रामातील ऐतिहासिक महत्त्व
हा बंगला 1942 ते 1945 दरम्यान भारत छोड़ो आंदोलनात राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन आणि अरुणा आसफ अली यांसारख्या थोर स्वातंत्र्यसैनिकांचे निवासस्थान होते. इतकेच नव्हे तर या बंगल्यातूनच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 'आझाद हिंद रेडिओ'चे प्रसारण होत असे. त्यामुळे या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व आहे.
276 कोटींच्या विक्रीत कोण सहभागी?
हा बंगला कपाडिया कुटुंबाच्या मालकीचा होता. जो त्यांनी वागेश्वरी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विकला आहे. या कंपनीच्या संचालकांमध्ये एलिना निखिल मेसवानी यांचा समावेश आहे. त्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक निखिल आर. मेसवानी यांच्या पत्नी आहेत. 28 फेब्रुवारी 2025 रोजी हा विक्री व्यवहार नोंदवण्यात आला. दस्तऐवजांनुसार, विक्रीदारांमध्ये उपेंद्र त्रिकमदास कपाडिया यांच्यासह 15 लोकांचा समावेश आहे. तर खरेदीदार वागेश्वरी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड आहे. या संपत्तीत जमीन आणि इमारत यांचा समावेश आहे.
advertisement
बंगल्याची वैशिष्ट्ये आणि जागेची किंमत
क्षेत्रफळ:  19,891 चौरस फूट
मालकी: पूर्वी कपाडिया कुटुंबाच्या मालकीचा
मूळ खरेदी किंमत: 1917 मध्ये केवळ 1.20 लाख रुपये
इमारत संरचना: ग्राउंड प्लस दोन मजले आणि एका मजल्याचा आडवा भाग
advertisement
मुंबईतील इतर महागडे रिअल इस्टेट व्यवहार
- उदय कोटक आणि कुटुंबाने वर्ली सी फेस येथे 202 कोटींना 12 अपार्टमेंट्स घेतली.
- रेखा झुनझुनवाला यांनी मालाबार हिलवर समुद्रदृश्य कायम ठेवण्यासाठी एक संपूर्ण निवासी इमारत विकत घेतली.
- डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी आणि त्यांच्या कुटुंबाने वर्ली येथे 1,238 कोटी रुपयांना 28 घरे विकत घेतली.
advertisement
मुंबईतील ऐतिहासिक बंगले आता कोट्यवधींमध्ये
'लक्ष्मी निवास'च्या विक्रीने मुंबईतील रिअल इस्टेट बाजारात नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी जपणारा हा बंगला आता व्यावसायिक मालकीचा झाला आहे. ज्यामुळे जुन्या ऐतिहासिक वास्तूंचे भवितव्य काय राहणार, याबद्दल उत्सुकता आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
मुंबईतील ऐतिहासिक बंगल्याची 276 कोटींना विक्री; स्वातंत्र्यसैनिकांसाठी गुप्त ठिकाण, 'आझाद हिंद रेडिओ'चे प्रसारण व्हायचे
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement