TRENDING:

Sonam Raghuwanshi:हत्येपूर्वीचा शेवटचा व्हिडीओ समोर, पर्यटकाच्या कॅमेऱ्यात चुकून कैद झाले राजा, सोनम आणि 'तो'!

Last Updated:

Indore Couple Missing Case :मेघालय पोलिसांनी राजा रघुवंशी हत्या प्रकरणात त्यांची पत्नी सोनम, प्रियकर राज आणि मारेकऱ्यांना अटक केली आहे. आता, या प्रकरणात नवीन अपडेट आली आहे.राजाची हत्या होण्यापूर्वी काही मिनिटे आधीचा व्हिडीओ समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इंदूर: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दररोज नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत. मेघालय पोलिसांनी राजा रघुवंशी हत्या प्रकरणात त्यांची पत्नी सोनम, प्रियकर राज आणि मारेकऱ्यांना अटक केली आहे. आता, या प्रकरणात नवीन अपडेट आली आहे.राजाची हत्या होण्यापूर्वी काही मिनिटे आधीचा व्हिडीओ समोर आला आहे.
Sonam Raghuwanshi Raja Raghuwanshi last video
Sonam Raghuwanshi Raja Raghuwanshi last video
advertisement

आतापर्यंतच्या तपासात मेघालय पोलिसांना या हत्येत राजाची पत्नी सोनमचा सहभाग असल्याचे उघड केले आहे. पोलिसांनी इंदूर आणि मध्य प्रदेशातील इतर शहरांमधून 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, सोनम आणि राजाचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. मेघालयातील डबल डेकर रूट ब्रिजवर प्रवास करताना एका पर्यटकाने हा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये राजा आणि सोनमचे फूटेज दिसून आले आहे. हा व्हिडीओ 23 मे 2025 रोजी सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारासचे आहे.

advertisement

या व्हिडीओत काय आहे?

इन्स्टाग्राम युजर m_devsingh याने हा व्हिडीओ अपलोड केला आहे. आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये त्याने म्हटले की, हा व्हिडीओ डबल डेकर रुट ब्रीज फिरण्याच्या दरम्यानचा आहे. 23 मे 2025 रोजी मेघालयातील डबल रुट ब्रिज फिरण्यासाठी गेलो होतो. मात्र, एकदा शूट केलेला व्हिडीओ पाहत असताना इंदूरमधील हे जोडपं दिसलं. या व्हिडीओची रेकोर्डिंग सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारासची आहे. त्यावेळी ट्रॅव्हलर m_devsingh हा उतरत होता. तर, सोनम आणि राजा हे नोंगिरियाट गावात रात्रीचा मुक्काम केल्यानंतर सकाळी डोंगरावर चढत होते.

advertisement

पाहा व्हिडीओ:

शेवटचा व्हिडीओ असल्याचा दावा...

m_devsing या युजर्सने राजा आणि सोनमचा हा शेवटचा व्हिडीओ असावा, असे म्हटले आहे. व्हिडीओत सोनमने व्हाइट शर्ट घातला आहे. हा शर्ट राजाजवळ आढळला होता. मेघालय पोलिसांना या व्हिडीओची मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आणखी एक व्हिडीओ असल्याचा दावा...

इन्स्टा युजर m_devsing देवेंदर सिंह याने म्हटले की, त्याच्याजवळ आणखी एक व्हिडीओ आहे. या व्हिडीओत इंदूरमधील आणखी तिघेजण दिसत आहेत. या तिघांनी सोनम आणि राजा या दाम्पत्याच्या 20 मिनिटे आधी

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
Sonam Raghuwanshi:हत्येपूर्वीचा शेवटचा व्हिडीओ समोर, पर्यटकाच्या कॅमेऱ्यात चुकून कैद झाले राजा, सोनम आणि 'तो'!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल