कल्याण डोंबिवली परिसरात पोलिसांकडून ड्रग्ज तस्कराविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून सातत्याने ही कारवाई सुरू आहे. कल्याण डीसीपी स्कॉडला खडकपाडा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या आंबिवली परिसरात बेकायदेशीरपणे एम.डी ड्रग्ज विक्री केले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीसीपी स्कॉडच्या पथकाने अटाळी परिसरात सापळा रचला.
advertisement
या ठिकाणी एक महिला स्कूटी घेऊन उभी होती. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तत्काळ तिला हटकले. तिची झडती घेतली असता तिच्याजवळ एक लाख 16 हजार रुपये किमतीचे एम. डी. ड्रग्ज आढळून आले. पोलिसांनी तत्काळ या महिलेला ताब्यात घेतलं. फिजा इराणी असं या महिलेचे नाव आहे.
फिजा इराणी ही आंबिवली जवळील कुप्रसिद्ध असलेल्या इराणी वस्तीमध्ये राहते. तिच्या विरोधात खडकपाडा, कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
