पैशाचा पाऊस..
जालना शहरातील इंदेवाडी भागातील सिद्धार्थनगरातील एक व्यक्ती घरात पैशांचा पाऊस पाडून पैसे दुप्पट करून देतो, अशी माहिती मिळाली होती. यावर विश्वास ठेवून बीडमधील बदामराव किसनराव नलवडे (55), भागवत रावसाहेब देवडे (42) आणि संदीप सुनील भोसले (33) यांनी 28 ऑक्टोबर 2024 रोजी सिध्दार्थनगर येथील त्या व्यक्तीचे घर गाठले. त्याला 11 लाख 70 हजार रुपये रोख व 30 हजार रुपये फोनपेवरून दिले. त्यानंतर याने घरात पैशांचा पाऊस पाडला व पैशांची गोणी भरून दिली. परंतु, सदर गोणी घेऊन आम्हाला कुणालाच बाहेर पडता आले नाही, असे तक्रारीत म्हटलेय.
advertisement
ऑनलाईन जीवनसाथी निवडला, तोच निघाला ठग, IT तल्या तरुणीला गंडा, कारनामे पाहून सारेच चक्रावले
फसवणुकीचा गुन्हा
काहीतरी जादूटोणा केल्यामुळे आम्हाला तिथून रिकाम्या हाताने यावे लागले. अंधश्रध्दा दाखवून आमची 12 लाखांची फसवणूक केली, असेही या तिघांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पैशाचा पाऊस पाडतो म्हणून फसवणुकीचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. यात जालन्यातील मांत्रिकाने पुण्यातील एका व्यापाऱ्यास 52 लाख रुपयांचा गंडा घातला होता. तर दोन महिन्यापूर्वीच एका माजी सैनिकालाही असेच फसविण्यात आले होते.
तक्रार संशयास्पद?
फसवणूकीच्या संदर्भात अशी तक्रार आली असल्याचे तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी म्हटले आहे. यात तक्रार देणाऱ्यांना प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. मात्र ते समोर आले नाहीत. दिलेली तक्रार संशयास्पद वाटत असली तरी या अनुषंगाने आम्ही चौकशी करतो आहोत, असे उनवणे यांनी सांगितले.






