कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील हनागलमधील हे सामूहिक बलात्कार प्रकरण. जानेवारी 2024 मध्ये एका महिलेवर 7 आरोपींनी बलात्कार केला. 25 वर्षांची पीडिता केएसआरटीसीच्या ड्रायव्हरसोबत बऱ्याच काळापासून रिलेशनमध्ये होती. दोघांचाही धर्म वेगळा होता. महिला हनागलमधील एका हॉटेलमध्ये थांबली होती. आरोपींनी तिला हॉटेलमधून घसटत जंगलात नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
वहिनीसोबत रिलेशन, लग्न कर म्हणताच ढसाढसा रडू लागला दीर, म्हणाला, माझे संबंध आहेत पण...
advertisement
याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेच्या साक्षीनंतर सामूहिक बलात्काराचा आरोप लावण्यात आला. एकूण 19 लोकांना अटक करण्यात आली. ज्यापैकी 12 जणांना 10 महिन्यांआधी जामीन मिळाला आहे. 7 मुख्य आरोपी अनेक महिन्यांपासून ताब्यात होते.
पोलीस तपासात डीएनए, सीसीटीव्ही, 80 साक्षीदारांची साक्ष होती. पण कोर्टात पीडित महिला आरोपींनी ओळखू शकली नाही. त्यामुळे इतर 7 आरोपींचीही सुटका झाली. त्यांना जामीन मिळाला. हावेरी सेशन कोर्टाने आफताब चंदनकट्टी, मदा साब मंडक्की, समीवुल्ला लालनवर, मोहम्मद सादिक अगासिमानी, शोएब मुल्ला, तौसीप छोटी, रियाज साविकेरीला जामीन दिला.
बाळाला घेऊन मेट्रोत चढला पुरुष, महिलेने मोठ्या मनाने दिली सीट, 2 सेकंदात 'मोठा गेम'
यानंतर जामीन मिळाल्याचा आनंद आरोपींनी साजरा केला. हावेरी उपजेलहून हा रोड शो सुरू झाला. बाईक, कार, म्युझिक, नारे अशी व्हिक्ट्री परेड काढली निघाली. हावेरीच्या अक्की अलूर शहरात ही परेड निघाली. आरोपींसह गाड्यांचे ताफे मुख्य रस्त्यावर निघाले. व्हिडीओत आरोपी हसत, विजय चिन्हं दाखवताना दिसत आहेत. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. लोकांना कठोर कारवाईची मागणी केली आहे.