ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री नानावली गोठ्याजवळ घडली. प्राथमिक माहितीनुसार, वर्गणीच्या रकमेवरून परिसरातील काही युवकांमध्ये वाद झाला होता. वाद वाढत गेला आणि संतप्त टोळक्याने रजावर धारदार शस्त्राने हल्ला केला. गळ्यावर मार लागल्याने रजा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
घटनेनंतर स्थानिकांनी प्रसंगावधान राखत रजाला तत्काळ नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी रजाची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. रुग्णालयात नातेवाइकांचा संताप अनावर झाला असून, परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवत आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलीस पथक अलर्ट मोडवर असून, परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये किरकोळ कारणांवरून घडणाऱ्या हाणामाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी अशा हिंसक घटनांवर आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची मागणी जोर धरत आहे.
समलिंगी संबंधाला विरोध, दोन अल्पवयीन मुलांनी तरुणालाच संपवलं
मिरज तालुक्यातील आरग गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 21 वर्षीय तरुणाने समलिंगी संबंधाला विरोध केल्याने त्याची दोन अल्पवयीन मुलांनी हत्या केली असल्याचा घटना घडली आहे. सुजल बाजीराव पाटील (वय 21, रा. आरग) या तरुणाचा मृतदेह आरग तलावात आढळून आला होता. याप्रकरणी दोन अल्पवयीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.