मिळालेल्या माहितीनुसार, कैलास पवार हा आपल्या पत्नीवर सतत चरित्र्यावर संशय घेत असे आणि वारंवार मारहाण करीत असे. यामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने अखेर संतापाच्या भरात दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. ही घटना कैलास झोपलेला असताना घडली. हत्या केल्यानंतर मृतदेह जंगलात नेऊन फेकण्यात आला.
पोलीसांना पवार याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्यावर त्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान, पत्नीच्या वागण्यात संशयास्पद हालचाली आढळून आल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने खुनाची कबुली दिली.
advertisement
या प्रकरणी तिच्याविरोधात भारतीय दंड विधानातंर्गत हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तिला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरेगावसारख्या शांत गावात घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलेली ही घटना घरगुती हिंसाचार आणि मानसिक त्रासाचे टोकाचे परिणाम कसे होऊ शकतात, याचे विदारक उदाहरण ठरत आहे.
अनैतिक संबंध, पतीला झालं नाही सहन, पत्नीचा चिरला गळा
ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या विभक्त झालेल्या पत्नीचा गळा चिरला आणि तिच्या प्रियकराचे गुप्तांग तीक्ष्ण हत्याराने तोडले, अशी धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. बुधवारी जाजपूर जिल्ह्यातील महालाट गावात ही घटना घडली. जराडा गावातील रहिवासी असलेला मनोज कुमार मोहंती नावाच्या आरोपीने आपली विभक्त झालेली पत्नी आणि तिचा सध्याचा प्रियकर प्रशांत नाथ यांच्यावर हल्ला केला.