धान्य दळत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा बरेच लोक बाजारातून थेट विकत पीठ आणणंच पसंत करतात. मात्र, आता असं करणाऱ्यांना सावध करणारी ही घटना आहे. अलिगडमधून एक असं प्रकरण समोर आलं आहे, जे सगळ्यांनाच हादरवून टाकणारं आहे. कारण ते आपल्या सर्वांच्या आरोग्याशी संबंधित आहे. इथे अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या (एफएसडीए) पथकाने एका पिठाच्या गिरणीवर छापा टाकला. यावेळी त्या पिठात दगडाची पावडर मिसळली जात असल्याचं आढळून आलं. पथकाने येथून 400 किलोहून अधिक दगडाची पावडर जप्त केली. पिठाच्या पाकिटात ते मिसळलं जात होतं.
advertisement
बहिणीच्या नवऱ्यावर जडला जीव; शेवटी दाजीच्या प्रेमात मेहुणीने केलं हादरवणारं कांड
एफएसडीएचे सहाय्यक आयुक्त अजय जयस्वाल म्हणाले, “अलिगढच्या औद्योगिक परिसरात पंचवटी आटा या ब्रँडच्या नावाने पीठ विकणाऱ्या पिठाच्या गिरणीवर छापा टाकण्यात आला. वरिष्ठ जिल्हा अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा छापा टाकला. परिसरातून 400 किलोपेक्षा जास्त स्टोन पावडर जप्त केली आहे.”
गुरुवारी छापा टाकण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. गिरणीतील पिठाच्या पोत्यांमध्ये दगडाची भुकटी मिसळली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. जयस्वाल म्हणाले, “छाप्यादरम्यान गिरणी कामगारांना पिठाच्या पिशव्यांमध्ये पावडर मिसळताना पकडण्यात आलं. आम्ही या कारखान्याच्या मालकावर पुढील कारवाई करण्याचं काम करत आहोत.” या पीठाच्या ब्रँडचा संपूर्ण साठा बाजारातून परत मागवण्याची मोहीम राबवली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.