बहिणीच्या नवऱ्यावर जडला जीव; शेवटी दाजीच्या प्रेमात मेहुणीने केलं हादरवणारं कांड

Last Updated:

मेहुणीने आपल्या दाजीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांमुळे असं कांड केली की थेट तुरुंगात पोहोचली. तरुणीने दाजीसोबत मिळून आपल्याच सख्ख्या भावाचा जीव घेतला.

मेहुणीचं दाजीसोबत अफेअर  (प्रतिकात्मक फोटो)
मेहुणीचं दाजीसोबत अफेअर (प्रतिकात्मक फोटो)
पाटणा : प्रेमात माणूस काहीही करू शकतो, असं म्हणतात. याचाच प्रत्यय देणारी एक अतिशय धक्कादायक घटना आता समोर आली आहे. यात एक तरुणी प्रेमात आपली नातीही विसरली. यात मेहुणीने आपल्या दाजीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांमुळे असं कांड केली की थेट तुरुंगात पोहोचली. तरुणीने दाजीसोबत मिळून आपल्याच सख्ख्या भावाचा जीव घेतला.
तरुणीच्या भावाला दाजी आणि तिच्या अफेअरबद्दल समजलं होतं. यानंतर भावाने याला विरोध केला होता. हेच दाजी आणि मेहुणीला खटकलं. यानंतर काहीही विचार न करता दोघांनी मिळून त्याची हत्या केली आणि मृतदेहाचीही विल्हेवाट लावण्यात आली. घटना बिहारच्या मुजफ्फरपुरमधील आहे.
कांटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकुरांहा खरगी गावात ही घटना घडली. येथे कोमल सिंह हिचे तिचाच दाजी असलेल्या संजीव सिंह याच्यासोबत अवैध संबंध होते. या अवैध संबंधाला कोमलचा भाऊ रितेश नेहमीच विरोध करत असे. पण रितेशला विरोध करणं खूपच महागात पडलं. त्याची सख्खी बहीण कोमल सिंह हिने अनैतिक संबंधासाठी आपलाच भाऊ असलेल्या रितेशची हत्या केली आणि त्याला मार्गातून कायमचं दूर केलं.
advertisement
कोमलने दाजी संजीव आणि इतरांसह मिळून तिच्या भावाला लोखंडी रॉडने एवढी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला. यानंतर दोघांनीही रितेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. मृताची पत्नी खुशबू हिला हा प्रकार कळताच तिने पोलिसांना घटनेची माहिती दिली.
advertisement
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी मेहुणी कोमल सिंहला अटक केली. तिचा दाजी संजीव सिंह आणि इतर आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांच्या शोधात पोलीस छापे टाकत आहेत. डीएसपी पश्चिम अभिषेक आनंद यांनी सांगितलं की, या प्रकरणात एकूण 6 आरोपी आहेत. ज्यामध्ये आरोपी दाजी संजीव सिंह आणि इतरांना पकडण्यासाठी पोलिसांचं विशेष पथक छापेमारी करत आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
बहिणीच्या नवऱ्यावर जडला जीव; शेवटी दाजीच्या प्रेमात मेहुणीने केलं हादरवणारं कांड
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement