फसवणूक आणि धमकी
फिर्यादी पीडित तरुणी आणि तिच्या दोन मैत्रिणींशी 'कल्पेश- गिर आंधळे-०लव्ह ३९' या इन्स्टाग्राम खात्यावरून संपर्क साधण्यात आला. मेसेज, व्हॉटस्ॲप आणि फोनद्वारे संवाद साधून संशयिताने वन खात्यात नोकरी लावून देतो असे खोटे आमिष दाखवले आणि त्यांचा विश्वास संपादन केला. या बनावातून त्याने पीडित युवतींची अस्सल छायाचित्रे आणि महत्त्वाची कागदपत्रे प्राप्त केली.
advertisement
मुंबईची वाहतूक कोंडी सुटणार; प्रवास होणार 5 मिनिटांत; जाणून घ्या कुठे आणि कसा होणार मार्ग?
खंडणीचा डाव आणि बदनामीचा कट
संशयिताने यानंतर आपले खरे स्वरूप दाखवले.
मॉर्फिंग: तिघींच्या अस्सल छायाचित्रांचा वापर करून त्यांची मॉर्फ केलेली अश्लील छायाचित्रे तयार केली.
ही अश्लील छायाचित्रे त्यांना पाठवून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
पैशांची मागणी
शिवीगाळ करत धमक्या देत त्यांच्याकडे पैशांची मागणी (खंडणी) केली. तसेच, पीडितांकडे आणखी अश्लील पद्धतीची छायाचित्रे पाठवण्याची मागणीही त्याने केल्याचे तक्रारीत नमूद आहे. खंडणी न मिळाल्याने संशयिताने बनवलेले काही खोटे अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचेही फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती फिर्यादी युवतीने नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी ''कल्पेश- गिर आंधळे-०लव्ह ३९' नावाच्या इन्स्टाग्राम खातेधारकाविरुद्ध खंडणी (Extortion), विनयभंग (Molestation) यांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत (IT Act) गुन्हा दाखल केला आहे. नाशिक शहर सायबर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






