TRENDING:

ज्याच्यासाठी नवऱ्याला सोडलं, त्यानंच केला घात, 2 मुलांच्या आईवर 4 वर्षे सामूहिक अत्याचार

Last Updated:

Sambhajinagar Rape Case: पतीला सोडून प्रियकराकडे राहणाऱ्या विवाहितेवर सामूहिक अत्याचार झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. ‘लिव्ह इन’मधील प्रियकरासह 3 भावांवर गुन्हा दाखल झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: प्रेमासाठी नवऱ्याला सोडलं, पण प्रियकरानंच घात केला. ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या 34 वर्षीय विवाहितेवर प्रियकराच्या 3 भावांनी 4 वर्षे लैंगिक अत्याचार केले. छत्रपती  संभाजीनगरमधील वाळूजमहानगरात ही घटना घडली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
'लिव्ह इन'मधील वहिनीवर पतीच्या भावांचा ४ वर्षे सामूहिक बलात्कार
'लिव्ह इन'मधील वहिनीवर पतीच्या भावांचा ४ वर्षे सामूहिक बलात्कार
advertisement

छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरात राहणारी पीडित पूजा (पीडित महिलेचे बदललेले नाव) ही इयत्ता 8 वीमध्ये असताना तिच्या शाळेची सहल सिद्धार्थ उद्यानात गेली होती. तेव्हा तिची संजय ( नाव बदलेले आहे) याच्याशी ओळख झाली. तेव्हापासून त्या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. दोघांचे प्रेमप्रकरण हे पूजाच्या घरी कळाल्यानंतर तिच्या आई-वडिलांना 2010 मध्ये पूजाचे एका तरुणासोबत लग्न लावून दिले.

advertisement

नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत

पूजा नवऱ्यासोबत दोन ते तीन वर्षे वाळूजमहानगर परिसरात राहिली. तिला नवऱ्यासोबत राहायचे नव्हते. त्यामुळे 2012 मध्येच प्रियकरासोबत निघून गेली. बजाजनगर येथे 5 ते 6 वर्षे विवाह न करता (लिव्ह इन प्रमाणेच) ती प्रियकरासोबत राहिली. प्रियकराच्या घरी त्याची आई, मोठा भाऊ, त्याची पत्नी, दुसरा भाऊ, त्याची पत्नी असे सर्व एकत्र राहतात.

advertisement

View More

महिन्याभरापूर्वीच विवाह, काही दिवस सुखी संसार, मग वादाला सुरुवात, आधी बायकोने आणि नंतर नवऱ्याने जीवन संपवलं

प्रियकरापासून 2 मुले

प्रियकरापासून पूजाला 13 वर्षाचा मुलगा व 6 वर्षाची मुलगी आहे. बजाजनगर येथे 2012 ते 2018 पर्यंत सर्वजण एकत्रित राहिले. त्यानंतर त्यांनी स्वतःचे घर रांजणगाव येथे घेतले. तेथेही 2018 ते 2024 पर्यंत राहिले. 2020 मध्ये लक्ष्मीच्या सणाला संजयचा मोठा भाऊ घरी आला. सण झाल्यानंतर रात्री घरातले सर्व झोपलेले असताना त्याने पूजा सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हे सर्व पूजाचा प्रियकर संजयला माहिती होते. त्याच्या संमतीनेच तो जबरदस्ती करत होता, असे तक्रारीत म्हटले आहे.

advertisement

तिघा दिरांकडून अत्याचार

2022 मध्ये संजयचा चुलत भाऊ एका रविवारी रांजणगाव येथील घरी मुक्कामी आला. त्या रात्री संजय घरीच असताना त्याने पूजासोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तेव्हा संजय त्याला काहीच बोलला नाही. त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. पूजा सांगते की, “मी आई-वडिलांकडे जाऊ शकत नव्हते. कारण त्यांच्या विरुद्ध जाऊन हे सर्व मी केलं. तसेच माझ्या नवऱ्याचं घर देखील मी स्वतःहून सोडलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे देखील मी जाऊ शकत नव्हते. तेव्हा या सगळ्याला कंटाळून पोलिसांत जाऊन तक्रार नोंदवली.”

advertisement

मुलीच्या नावाने ब्लॅकमेल

संजयचा आणखी एक भाऊ 14 मार्च 2024 ला रांजणगाव येथील घरी आला होता. तेव्हा मुलीच्या नावाने ब्लॅकमेल करून त्याने देखील जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत होते. गेल्या 4 वर्षांपासून संजय आणि त्याचे तिघे भाऊ हे जबरदस्ती अत्याचार करत होते, असं पूजानं सांगितलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी पडतेय? शरिराला लावा तिळाचे कोमट तेल, होतील हे फायदे
सर्व पहा

दरम्यान, याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

मराठी बातम्या/क्राइम/
ज्याच्यासाठी नवऱ्याला सोडलं, त्यानंच केला घात, 2 मुलांच्या आईवर 4 वर्षे सामूहिक अत्याचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल