याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले सिलसिद्ध यांची पोलीस ठाण्यात नाईट ड्युटी होती. त्यामुळे ते पोलीस ठाण्यात गेले होते. घरामध्ये पत्नी अश्विनी व दोन मुले होती. मध्यरात्री अश्विनीने दोन्ही मुलं झोपलेली असताना त्यांच्यासोबत सेल्फी घेतला आणि जवळच राहत असलेल्या नातेवाईकाला फोन करून आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली. नेहमीच अश्विनी अशी धमकी देत होती म्हणून नातेवाईकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.
advertisement
Solapur News : मुलगी लग्नाला नाही म्हणाली हीच तिची चूक, बापाच्या कृत्याने सोलापूर हादरलं
अश्विनीचा मेसेज नातेवाईकांनी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पाहिला आणि तिच्या पतीला माहिती दिली. सिलसिद्ध यांनी अश्विनीला फोन केला पण त्यांनी फोन उचलला नाही. घराजवळ राहत असलेल्या नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली. मात्र दरवाजा आतून बंद होता. काही वेळातच पोलीस पती सिलसिद्ध त्या ठिकाणी आले आणि दरवाजा तोडला. आतमध्ये पाहिले असता अश्विनीने साडीच्या साह्याने सिलिंगच्या लोखंडी कडेला गळफास घेतल्याचे दिसले.
पती आणि इतरांनी खाली उतरून उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर ज्या पोलीस ठाण्यात अश्विनीचे पती कार्यरत आहेत, त्याच पोलीस ठाण्यामध्ये पत्नीने आत्महत्या केल्याची नोंद झाली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे.






