Swami Chaitanyananda Saraswati Arrested: श्री शारदा इन्स्टिट्यूटमध्ये 17 विद्यार्थींनीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली बाबा चैतन्यनंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी याच्या मुसक्या आवळल्या. मागील काही दिवसांपासून दिल्ली पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. अखेर पहाटेच्या सुमारास चैतन्यानंदला अटक करण्यात आली आहे.
advertisement
दिल्लीतील एका महाविद्यालयात 17 मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या बाबा चैतन्यनंद स्वामी उर्फ पार्थ सारथी मागील काही दिवसांपासून पसार झाला होता. अटक टाळण्यासाठी कोर्टातही धाव घेतली होती. अखेर त्याला आग्रा येथून अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी त्यांना वसंत कुंज पोलीस ठाण्यात नेले आहे. ही घटना दक्षिण दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट येथे घडली. तेथील विद्यार्थींनींनी बाबा चैतन्यनंदविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली आहे. दिल्लीतील वसंत कुंज पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वृत्तानुसार, त्याला आग्रातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. रविवारी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला आग्राच्या ताजगंज येथील हॉटेल फर्स्ट येथून अटक करण्यात आली.
"बेबी, आय लव्ह यू" असे मेसेज
एफआयआरमध्ये नोंदवलेल्या विद्यार्थिनींचा जबाब धक्कादायक आहे. 62 वर्षीय स्वामी चैतन्यनंद सरस्वती रात्री उशिरा महिला विद्यार्थिनींना त्यांच्या खोलीत बोलावत असत आणि त्यांना विचित्र संदेश पाठवत असत. मध्यरात्रीनंतर तो वारंवार "बेबी, आय लव्ह यू, आय लव्ह यू," "तू आज खूप सुंदर दिसतेस," आणि "माझ्या जवळ ये" असे मेसेज पाठवत असे. जेव्हा विद्यार्थिनींनी नकार दिला तेव्हा तो प्राध्यापकांशी हस्तक्षेप करून त्यांच्यावर दबाव आणत असे, अशी तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतरही प्रतिसाद न दिल्यास चैतन्यानंद सरस्वती हा मुलींना वर्गातील अनुपस्थिती कमी दाखवण्याची अथवा परीक्षेत कमी गुण देण्याची धमकी देत असे.