पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात रोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कारवाई सुरू केलीये. तर काही लोकांनी पीडितेवरच आक्षेप नोंदवले. त्यामुळे अत्याचाराच्या घटनेनंतर देखील पीडितेवर व्यवस्थेचे अत्याचार सुरू असल्याचा संताप व्यक्त होतोय. याबाबतच ॲड. श्रीया आवले यांनी माहिती दिलीये.
advertisement
ॲड. श्रीया सांगतात की, “स्वारगेटमध्ये मुलीसोबत झालं ते अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे. हा बलात्काराचा गुन्हा गंभीर असल्याने कुठल्याही महिलेसोबत असं घडू नये. असे गुन्हे घडल्यानंतर कायद्याची एक प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. पण पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तिला तोच प्रसंग वारंवार सांगायला लावला. त्यानंतर देखील तिचं मेडिकल करण्यात आलं तेव्हा देखील चार वेगवेगळ्या डॉक्टरांना तीच घटना सांगायला लागली. वैद्यकीय चाचणी देखील महिला डॉक्टरांनी करणं अपेक्षित होतं. मात्र, ती देखील पुरुष डॉक्टरांनी केली. त्यामुळे पीडित मुलीला व्यवस्थेच्या अत्याचारांना सामोरं जावं लागलं.”
डॉक्टर मुलीनेच केली विधवा आईची फसवणूक, अडीच कोटींना गंडा, पुण्यातील प्रकार
बलात्कारासारख्या घटनेत प्रथम दर्शनी पीडितेची बाजू ऐकून घेतली जाते. तसेच ती जे म्हणते ते मानण्याचा कायदा आहे. परंतु, राजकीय नेते, पोलीस यांच्याकडून या गोष्टीबाबत वेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. तिने पैसे घेतले, सहमतीनं झालं, असं बोलून तिच्यावर पुन्हा अन्याय केला जातो. स्वारगेड प्रकरणात आता पोलिसांच्या तपासातूनच सत्य समोर आलंय. परंतु, यातून एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतो, अशी खंत ॲड. श्रीया व्यक्त करतात.
आरोपीला फाशी होणार नाही
सध्या अनेकजण आरोपी दत्तात्रय गाडेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. तर काहीजण आम्ही फाशीची शिक्षा देऊ असं सांगतात. परंतु, अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा कायद्यात काही शिक्षेच्या तरतुदी आहेत. त्यानुसारच शिक्षा होत असते. जर पीडिता स्वत: काहीच करू शकत नाही. जागेवरून देखील उठू शकत नाही, अशा वेळी फाशीची शिक्षा होते. तसेच तिचा मृत्यू झाल्यास आरोपीला फाशी होते. परंतु, इतर प्रकरणांत जन्मठेपेच्या शिक्षेची तरतुद असल्याचे ॲड. श्रीया सांगतात.





