संबंधिती महिलेला लग्नानंतर बरीच वर्ष मुल होत नव्हते. मुलाच्या इच्छेसाठी तिने पतीला घरकाम करणाऱ्या मोलकरणीसोबत संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले आणि याबदल्यात तिला (मोलकरणीला) जमिन देण्याचे आमिष दिले. मात्र, मोलकरणीने नकार दिल्यानंतर या महिलेने थेट जबरदस्तीचा मार्ग स्वीकारत तिच्यावर अत्याचार घडवून आणला. सदर घटना समोर आल्यानंतर पती-पत्नी दोघेही फरार झाले असून, पोलिसांनी त्यांच्यावर 10 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.
advertisement
12 वर्षांच्या मुलीला गिफ्ट्सच्या जाळ्यात अडकवले आणि...; अंगावर शहारे आणणारी घटना
कामासाठी बोलावले आणि...
पीडित महिला ही कुशीनगरची रहिवासी असून, तिने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी बृजपाल सिंह याने तिला फोन करून घरकामासाठी बोलावले. मासिक वेतन 10 हजार रुपये देण्याचे कबूल केले. त्यानंतर शाहपूर भागातील बृजपालच्या भाड्याच्या घरात राहून तिने काम करण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी आरोपीच्या पत्नी सोनिया हिने तिला सांगितले की, “माझ्या पोटी मूल होत नाही, त्यामुळे तू माझ्या नवऱ्यासोबत संबंध ठेवलेस तर तुला जमीन देईन. मात्र, मोलकरणीने हा प्रस्ताव ठामपणे नाकारला.
वाहनचालक घरी आला, संशय आल्याने पोलिसांना कळवले; दरवाजा उघडल्यानंतर दिसले भयंकर
मद्य , धमकी, व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंग
पीडितेने सांगितले की, एका रात्री सोनिया ही दारूच्या नशेत माझ्या खोलीत आली आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने पतीला माझ्यावर अत्याचार करण्यास भाग पाडले. मी विरोध केला. तिने मला आमिष दिले की, जर मी बाळाला जन्म दिला, तर मला अजमेरमध्ये फ्लॅट आणि जमीन देईन. जेव्हा मी पुन्हा नकार दिला, तेव्हा तिने माझा व्हिडिओ बनवला आणि ब्लॅकमेल करत अनेक दिवस मला घरातच कैद ठेवले. दरम्यान, तिच्या पतीकडून माझ्यावर सतत अत्याचार केला जात होता. शेवटी, मी कुठल्यातरी मार्गाने पळ काढला आणि पोलिसांकडे धाव घेतली.
या घटनेबाबत शाहपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटी एसपी अभिनव त्यागी यांनी सांगितले की, हा प्रकार जून 2024 मध्ये घडलेला आहे. आरोपी बृजपाल सिंह आणि त्याची पत्नी सोनिया सिंह यांच्याविरोधात बलात्कार आणि अन्य गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. दोघेही सध्या फरार असून, त्यांच्यावर प्रत्येकी 10 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. आरोपी बृजपाल सिंह मूळचा मथुरा जिल्ह्यातील नंदगाव कोसीकलाचा रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम तीव्र केली असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.