Crime News: 12 वर्षांच्या मुलीला गिफ्ट्सच्या जाळ्यात अडकवले आणि...; अंगावर शहारे आणणारी घटना, पाहा काय घडले
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
Girl Sexually Abusing: कन्नूरमध्ये एका धक्कादायक घटनेत 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली 23 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. मोबाईल फोनमधील संशयास्पद माहितीमुळे हा गुन्हा उघडकीस आला. समुपदेशन सत्रादरम्यान पीडित मुलीने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
कन्नूर: जिल्ह्यात 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली 23 वर्षीय महिलेची शुक्रवारी अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी महिलेचे नाव स्नेहा मर्लिन असून ती तालिपराम्बा जवळील पुलिमपरंबा येथील रहिवासी आहे.
गुन्हा उघडकीस कसा आला?
या प्रकरणाचा खुलासा चाइल्डलाइन अधिकाऱ्यांनी घेतलेल्या समुपदेशन सत्रात झाला. एका शाळकरी मुलीच्या बॅगेतून शिक्षकाने मोबाईल फोन जप्त केला. फोनमध्ये संशयास्पद बाबी आढळून आल्याने त्यांनी मुलीच्या पालकांना याबाबत माहिती दिली.
शिक्षकांच्या सल्ल्यानुसार, पालकांनी मुलीला समुपदेशनासाठी चाइल्डलाइनकडे नेले , जिथे तिने स्नेहा मर्लिनकडून वारंवार लैंगिक शोषण झाल्याचा खुलासा केला.
advertisement
गिफ्टच्या माध्यमातून फूस लावली
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिलेने पीडित मुलीचा विश्वास संपादन करण्यासाठी सोन्याचे ब्रेसलेट व अन्य भेटवस्तू दिल्या होत्या.
फेब्रुवारीतील घटनेप्रकरणी अटक
ही अटक फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गैरवर्तनाच्या घटनेसंदर्भात करण्यात आली आहे. समुपदेशन सत्रात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुलांचे संरक्षण आणि त्यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 15, 2025 1:15 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News: 12 वर्षांच्या मुलीला गिफ्ट्सच्या जाळ्यात अडकवले आणि...; अंगावर शहारे आणणारी घटना, पाहा काय घडले