Crime News: पित्याच्या वासनांध इच्छेपुढे माया हरली; घरातच रक्ताची होळी, मुलांचा गळा दाबून खून, केला भयानक प्रकार
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
Crime News: ओडिशाच्या नयागढ जिल्ह्यात पित्याने आपल्या दोन अल्पवयीन मुलांची निर्घृण हत्या केली. दुसऱ्या विवाहाला विरोध केल्यामुळे पित्याने स्वतःच्या आईच्या मदतीने दोघांचे गळा घोटून जीवन संपवले.
भुवनेश्वर: ओडिशाच्या नयागढ जिल्ह्यात एका बापानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना आणि त्याच्या आईला (मुलांची आजी) अटक केली आहे.
ही घटना ९ मार्च रोजी फतेहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही मुलांचे मृतदेह त्यांच्या घरातील एका बंद खोलीत आढळले. मृतांची ओळख १४ वर्षीय आकाश मोहंती आणि ९ वर्षीय विकास मोहंती अशी करण्यात आली आहे.
advertisement
पोलीस अधीक्षक एस. सुश्री यांनी सांगितले की, आरोपीच्या पहिल्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तो दुसऱ्या लग्नाच्या तयारीत होता. मात्र, त्याची दोन्ही मुले, विशेषतः मोठा मुलगा आकाश, या निर्णयाला विरोध करत होता. त्यामुळे आरोपीने आपल्या आईच्या मदतीने दोन्ही मुलांची गळा दाबून हत्या केली आणि त्यांचे मृतदेह छताला लटकवले.
advertisement
हत्या झालेल्या मुलांचे मामा अंतर्मयी मोहंती यांनी आधीच संशय व्यक्त केला होता की, ही हत्या कुटुंबातीलच सदस्यांनी केली आहे, कारण मुले वडिलांच्या दुसऱ्या लग्नाच्या विरोधात होती. नंतर मुलांची नानीही पोलिसांत धाव घेत, मुलांना वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचा तीव्र विरोध होता," असे सांगितले. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 13, 2025 8:35 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News: पित्याच्या वासनांध इच्छेपुढे माया हरली; घरातच रक्ताची होळी, मुलांचा गळा दाबून खून, केला भयानक प्रकार