वाहनचालक घरी आला, संशय आल्याने पोलिसांना कळवले; दरवाजा उघडल्यानंतर दिसले भयंकर, संपूर्ण कुटुंब एका रात्रीत संपले
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
Chennai News: चेन्नईतील अन्ना नगरमध्ये एकाच कुटुंबातील चार जण मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हे आत्महत्येचे प्रकरण असण्याची शक्यता आहे.
चेन्नई : चेन्नईच्या अन्ना नगर परिसरात एकाच कुटुंबातील चार जण आपल्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलांसह एक डॉक्टर आणि त्यांच्या वकिल पत्नीचा समावेश आहे. प्राथमिक तपासानुसार हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
कसे उघडकीस आले प्रकरण?
गुरुवारी (१३ मार्च) रोजी डॉक्टर बालामुरुगन (५२) यांचा वाहनचालक त्यांच्याकडे कामासाठी आला. परंतु, घरातून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने संशय व्यक्त करत त्वरित पोलिसांना कळवले. पोलिसांनी दरवाजा उघडल्यानंतर भयंकर वास्तव समोर आले. एका खोलीत डॉक्टर बालामुरुगन आणि त्यांची पत्नी सुमती (४७) मृत अवस्थेत आढळले, तर दुसऱ्या खोलीत त्यांचे दोन्ही मुलगेही मृत अवस्थेत होते.
advertisement
कर्जाच्या बोजामुळे आत्महत्या?
थिरुमंगलम पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, प्राथमिक चौकशीत कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे आत्महत्येचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून, मृत्यूसंदर्भात इतर कोणतेही कारण आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
advertisement
ही दुर्दैवी घटना संपूर्ण परिसराला हादरवून सोडणारी असून, स्थानिक नागरिकांमध्येही या घटनेबाबत मोठी चर्चा सुरू आहे. पुढील तपासानंतरच या प्रकरणातील अधिक माहिती समोर येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 13, 2025 1:23 PM IST
मराठी बातम्या/देश/
वाहनचालक घरी आला, संशय आल्याने पोलिसांना कळवले; दरवाजा उघडल्यानंतर दिसले भयंकर, संपूर्ण कुटुंब एका रात्रीत संपले