हृदयद्रावक, जीव वाचवणाऱ्या अॅम्ब्युलन्सने 3 वर्षाच्या मुलाचा जीव घेतला; काळीज चर्र करणारा Video
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
बैतूल-नागपूर फोरलेनवर एक हृदयद्रावक अपघात घडला, ज्यात तीन वर्षीय चिमुकल्याला वेगाने धावणाऱ्या ॲम्ब्युलन्सने चिरडले. हा दुर्दैवी प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला असून, काही क्षणातच निष्पाप बाळाचा मृत्यू झाला. पोलिसांनी ॲम्ब्युलन्स चालकाचा शोध सुरू केला आहे.
बैतूल: मध्य प्रदेशच्या बैतूल-नागपूर फोरलेनवर एक हृदयद्रावक अपघात घडला. तीन वर्षांचा मुलगा अचानक महामार्गावर आला आणि काही क्षणांतच भरधाव अॅम्ब्युलन्सने त्याला चिरडले. या दुर्दैवी घटनेचा संपूर्ण व्हिडिओ हायवेवरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
ही घटना मुलताई पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अपघातावेळी मुलाचा वडील आपल्या शिक्षक पत्नीला शाळेत सोडण्यासाठी निघाले होते. मात्र, वाटेत त्यांच्या दुचाकीचे पेट्रोल संपल्याने त्यांनी ती रस्त्याच्या कडेला उभी केली आणि बाटलीत पेट्रोल घेण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे असलेल्या पेट्रोल पंपावर गेले. त्यावेळी मुलाची आई आणि 3 वर्षीय चिमुकला दुचाकीच्या जवळ उभे होते. अचानक मुलगा धावत हायवेवर आला आणि भरधाव अॅम्ब्युलन्सने त्याला धडक दिली.
advertisement
हायवेवर खेळत असलेल्या चिमुकल्याला भरधाव अॅम्ब्युलन्सने उडवले, सीसीटीव्हीत कैद झालेला हादरवणारा क्षण! pic.twitter.com/sIKfVR1ard
— News18Lokmat (@News18lokmat) March 12, 2025
धडकेनंतर मुलगा सुमारे 25 फूट दूर जाऊन कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर मुलताई पोलीस अॅम्ब्युलन्स आणि तिच्या चालकाचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा अपघात इतक्या वेगाने घडल्याचे दिसते की, चालकाकडेही सावध होण्याचा वेळ नव्हता. मात्र, वेग कमी असता तर कदाचित या निष्पाप जीवाला वाचवता आले असते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 12, 2025 7:56 PM IST
मराठी बातम्या/Viral/
हृदयद्रावक, जीव वाचवणाऱ्या अॅम्ब्युलन्सने 3 वर्षाच्या मुलाचा जीव घेतला; काळीज चर्र करणारा Video