आई कुठे काय करते ही मालिका संपल्यानंतर मधुराणी सध्या ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या नाटकात काम करत आहे. या नाटकाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिच्या वाढदिवशी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. हा प्रयोग हाऊसफुल्ल झाला. प्रेक्षकांनी नाटक पाहून मधुराणीचे कौतुक केले, तिला मिठी मारली. प्रेक्षकांचे इतके प्रेम पाहून मधुराणी देखील भावुक झाली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. या खास क्षणाचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
advertisement
मधुराणीने प्रयोगाचा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलंय, “हाऊसफुल्ल वाढदिवस… कृतज्ञ… निव्वळ कृतज्ञ… ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’. ‘शुभंकर वाट्याला यायचं, तर ओंजळ तर उघडी असायला हवी ना’, डॉ. समीर कुलकर्णी यांनी लिहिलेलं आमच्याच नाटकातलं हे वाक्य. ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या विलक्षण संहितेचा आपण एक भाग असणं आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा पहिला प्रयोग होणं ही त्या विठ्ठलाचीच कृपा. मी फक्त ओंजळ उघडी ठेवण्याचा अवकाश होता, हा योग होताच कदाचित. हाऊसफुल्ल गर्दीत झालेला खणखणीत प्रयोग, भारावलेली मनं आणि त्या दिवशी मिळालेले अनंत आशीर्वाद! कायम लक्षात राहील असा हा वाढदिवस! आणि काय हवं असतं एखाद्या कलाकाराला?”
मधुराणीच्या या पोस्टवर तिच्या चाहिन्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. सर्वांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
