आई कुठे काय करते ही मालिका 2019 पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. आज या मालिकेला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. मालिका नेहमीच TRPच्या शर्यतीत नंबर वन ठरली आहे. मालिकेच्या कथेने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील सगळी पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटली. मालिकेत सुरुवातीला एकही खलनायक नव्हता. मानवी भावभावनांवर आधारित आई सारखा अगदी नाजूक विषय या मालिकेत मांडला गेला.
advertisement
तब्बल पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर अरुंधतीच्या रिटायरमेंटची वेळ आली आहे. अरुंधती रिटायर्ड होणार आहे. आई कुठे काय करते मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अरुंधती जरी रिटायर्ड होत असली तरी तिच्या जागी नवी आई जॉइन होणार आहे.
असं म्हणतात की आई कधीच रिटायर्ड होत नाही त्यामुळे मराठी टेलिव्हिजनवर अरुंधतीची जागा घेण्यासाठी शुभा घेणार आहे. आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही नवी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होत आहे. 2 डिसेंबरपासून ही मालिका दुपारी 2.30 प्रेक्षकांना पाहता येणार आहे. म्हणजेच आई कुठे काय करते ही मालिका 30 नोव्हेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 30 नोव्हेंबरला मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट होणार आहे.
आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहेत. भाग्य दिले तू मला या मालिकेनंतर निवेदिता सराफ या नव्या मालिकेत दिसणार आहेत. आई कुठे काय करते ही मालिका संपत असली तरी नवी आई प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता नवी आई प्रेक्षकांची मनं जिंकण्यात किती यशस्वी होते हे 2 डिसेंबरनंतरच कळणार आहे.