आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नाचा बार उडवून देण्यासाठी संपूर्ण खान फॅमिली सज्ज झाली आहे. आमिरची लाडकी लेक 3 जानेवारी रोजी बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्न करणार आहे. काही महिन्यांआधीच दोघांचा साखरपुडा देखील झाला. खान कुटुंबाची लेक आता शिखऱ्यांच्या घरची अस्सल मराठमोळी सून होणार आहे.
हेही वाचा - लेकीने तोंडात बोट घालू नये म्हणून काय करते आलिया? अभिनेत्रीनं शोधली भन्नाट ट्रिक
advertisement
आयरा आणि नुपूर 3 जानेवारी रोजी आधी रजिस्टर मॅरेज करणार आहे. आधी कायदेशीर नवरा बायको झाल्यानंतर दोघेही राजस्थानच्या उदयपूरला रवाना होणार आहे. उदयपुरला आयरा आणि नुपूर यांचा साग्रसंगीत विवाह सोहळा पार पडणार आहे. उदयपुरमध्ये दोघेही सात फेरे घेणार आहे. हळदी पासून, मेहंदी ते संगीत नाईट असे सगळे कार्यक्रम उदयपूरमध्ये साजरे होणार आहे.
आमिरची लेक लग्न करत असली तरी यावर आमिर खानची कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. पण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दोघे लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 3 जानेवारीपासून आयरा आणि नुपूरच्या लग्नविधी उदयपूरमध्ये सुरू होणार आहेत. दिल्ली ऐवजी 13 जानेवारीला मुंबईत दोघांच्या लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी होणार आहे.
आयरा आणि नुपूरच्या ग्रँड वेडिंग पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड आणि टेलिव्हिजन कलाकारांना आमंत्रण देण्यात आलं आहे. आमिरचं संपूर्ण कुटुंब लाडक्या लेकीच्या लग्नासाठी उत्सुक आहे. 2020पासून आयरा आणि नुपूर रिलेशनमध्ये आहेत. नुपूरनं इटलीमध्ये आयरला लग्नासाठी मागणी घातली होती.