सोमवारी म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी अभिनेते संजय खान यांची पत्नी जरीन खान यांची प्रेयर मीटिंग होती. त्या प्रेयर मीटिंगला बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती ज्याच जितेंद्र देखील आले होते. प्रेयर मीटिंग वेन्यूमध्ये जात असताना जितेंद्र दारातच पडले.
advertisement
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, जितेंद्र त्यांच्या कारमधून व्यवस्थित खाली उतरले. ते वेन्यूच्या दिशेनं जात असताना एक छोटी पायरी तिथे होती. जितेंद्र कारमधून उतरून जात असताना कोणाशीतरी बोलत आत जात असताना छोट्या पायरीत त्यांचा पाय अडखळला, त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. ते पडताच त्यांचे सहकारी धावले आणि त्यांनी उचललं. सुदैवानं जितेंद्र यांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यांचा हा व्हिडीओ पाहून मात्र चाहत्यांना चिंता व्यक्त केली आहे. काहींनी पापाराझींवर नाराजी व्यक्त केली. त्यांची पर्सनल मुमेन्ट का दाखवली यावर राग देखील व्यक्त केला.
7 नोव्हेंबर रोजी जरीन खान यांचा त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी कार्डियक अरेस्टने मृत्यू झाला. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या अनेक वर्ष आजारी होत्या. मॉडेलिंग आणि इंटीरियर डिझाइनर असलेल्या जरीन यांना शेवटचा निरोप देताना सगळ्यांना अश्रू अनावर झाले होते. जरीन या मुळत: पारसी होत्या. त्यांनी लग्नानंतर हिंदू धर्म, परंपरा स्वीकारल्या होत्या. त्यांच्यावर हिंदू रीतीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
जरीन यांच्या प्रेयर मीटिंगला रानी मुखर्जी, ऋतिक रोशन, सबा आजाद, आलिया गोनी, मलायका अरोरा, हेलन, ईशा देओल, सलीम खान सारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
