TRENDING:

'नशीबवान' मालिकेत आदिनाथ कोठारेची एन्ट्री! पहिली सीरियल 100 दिवसांत संपलेली, टायटल साँग तर होतं अंगावर काटा आणणारं

Last Updated:

Adinath Kothare Serial : अभिनेता आदिनाथ कोठारेची पहिली टेलिव्हिजन मालिका 100 दिवसच संपली. कोणती होती ती मालिका? मालिकेचं टायटल साँग तर अंगावर काटा आणणारं होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

मुंबई : टेलिव्हिजनवर काही नव्या मालिकात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातील एक मालिका म्हणजे 'नशीबवान'. 15 सप्टेंबरपासून ही मालिका स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे. या मालिकेत मराठीतील दमदार स्टारकास्ट आहे. अभिनेता आणि निर्माता आदिनाथ कोठारे या मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहे. आदिनाथ कोठारेला आपण अनेक सिनेमा आणि वेबसीरिजच्या माध्यमातून भेटतच असतो. नुकताच त्याच्या पाणी या सिनेमासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. आदिनाथची ही पहिली दैनंदिन मालिका आहे असं जरी त्याने म्हटलं असलं तरी या आधी त्याची एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती जी फक्त 100 दिवसच संपली. कोणती होती ती मालिका? मालिकेचं टायटल साँग तर अंगावर काटा आणणारं होतं.

advertisement

आदिनाथ कोठारे नशिबवान मालिकेतून रुद्रप्रताप घोरपडे या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रुद्रप्रताप घोरपडे हा नागेश्वर घोरपडेचा एकुलता एक मुलगा. दिसायला एखाद्या राजकुमारासारखा रुबाबदार. स्वभावाने मनमिमळावू, सर्वांची मदत करणारा रुद्रप्रताप नागेश्वरच्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध आहे.

advertisement

( सोहमचं 'ठरलं तर मग'! 35 वर्षांआधी 50 रुपयात झालेलं 'भावोजीं'चं लग्न, आदेश-सुचित्राची फिल्मी Love Story )

वडिलांचा मोठा बिझनेस असल्याने रुद्रला परदेशी पाठवण्याची त्याच्या वडिलांची म्हणजेच नागेश्वरची इच्छा होती. पण रुद्रने गावात राहून गावातल्या लोकांच्या मदतीसाठी आणि सेवेसाठी आपलं आयुष्य वाहून घेण्याचा निर्णय घेतला.

advertisement

आदिनाथ कोठारेसाठी रुद्रपताप ही भूमिका ड्रीमरोल आहे. या भूमिकेविषयी सांगताना आदिनाथ म्हणाला, "या मालिकेसाठी मी प्रचंड उत्सुक आहे. 'माझी पहिली दैनंदिन मालिका आहे. गेली अनेक वर्ष मालिका करण्याचा विचार सुरु होता. नशिबाने नशिबवान मालिकेच्या निमित्तानेच हा योग जुळून आला. टीव्ही हे फक्त माझंच नाही तर प्रत्येकाचच आवडतं माध्यम आहे. मालिकेच्या माध्यमातून तुम्ही घराघरात पोहोचता, प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग होता. नशिबवान मालिकेची गोष्ट अतिशय सुंदररित्या गुंफण्यात आलीय. रुद्रप्रताप या भूमिकेला देखिल अनेक पदर आहेत. जे हळू हळू उलगडतील."

advertisement

2016 मध्ये आदिनाथची एक मालिका झी मराठी वाहिनीवर सुरू झाली होती. या मालिकेचं फक्त 100 एपिसोड्सच प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. मालिकेत आदिनाथने एका पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. आदिनाथ कोठारे, तेजस्विनी पंडित आणि रमेश भाटकर या मालिकेत प्रमुख भूमिकेत होती. ही मालिका शंभर एपिसोडमध्ये संपली कारण ती 100 दिवसांचीच एपिसोडीक मालिका होती. ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत ही मालिका सुरू होती. या मालिकेचं नाव होतं '100 डेज्'

'100 डेज्' या मालिकेचं टायटल साँग देखील अंगावर काटा आणणारं होतं. मालिका मराठी असली तरी मालिकेचं टायटल साँग हिंदी भाषेत होतं. त्यातील काही शब्द हे भोजपुरी होते. मालिकेला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. 100 एपिसोड असलेली मालिका करणं हा एक वेगळा प्रयोग करण्यात आला होता. आजही ही मालिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आदिनाथ आणि तेजस्विनी पंडित यांचा अभिनय प्रेक्षक विसरू शकत नाहीत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'नशीबवान' मालिकेत आदिनाथ कोठारेची एन्ट्री! पहिली सीरियल 100 दिवसांत संपलेली, टायटल साँग तर होतं अंगावर काटा आणणारं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल