‘पुष्पा 2’ सिनेमासाठी अल्लू अर्जुनने त्याची दाढी आणि केसही वाढवले होते. या सिनेमासाठी त्याने खूप मेहनत घेत हा लूक सेट केला होता. अखेर सिनेमा रिलीजनंतर आणि बॉक्स ऑफिसवर मोठ्या यशानंतर अल्लू अर्जुनने त्याचा लूक बदलला आहे. त्याने दाढी आणि लांब केस कट केले. या नव्या लूकमध्ये अल्लू अर्जुन पोलीस स्टेशनला पोहोचला. यावेळी त्याच्या या लूकने चाहत्यांची मने जिंकली.
advertisement
पुष्पा 2 स्टार लहान केस आणि ट्रिम केलेल्या दाढीसह नामपल्ली कोर्टात हजर झाला होता. यावेळीचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये त्याच्या नव्या लूकचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. चाहत्यांनी त्याच्या नव्या लूकचे कौतुक केले.
दरम्यान, अल्लू अर्जुनला दिलासा मिळाला असला तरी, त्याला न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात जाण्याची मनाई आहे. प्रत्येक रविवारी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन स्वाक्षरी करावी लागणार आहे. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 च्या प्री-स्क्रीनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, रेवती नावाच्या 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा आठ वर्षांचा मुलगा सध्या एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आहे. या प्रकरणी अल्लू अर्जुन चांगलाच अडकला होता. मात्र आता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.