सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिषेक ऐश्वर्याची खूप काळजी घेत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तिघेही एकत्र शाळेत एंट्री करताना दिसतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याचे बॉन्डिंग पाहायला मिळालं. दोघेही बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसल्याने चाहत्यांच्या मनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
अभिषेक आणि ऐश्वर्या यांना एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाच पण बिग बी अमिताभ बच्चन यांनाही सर्वांचं लक्ष वेधलं. बऱ्याच दिवसांनी बच्चन कुटुंब दिसले मेगास्टार अमिताभ बच्चन देखील या कार्यक्रमाचा एक भाग झाले. ऐश्वर्यानंतर अमिताभ बच्चन देखील कारमधून उतरले. ऐश्वर्या अभिषेक आणि अमिताभ अनेक वर्षांनी एकत्र दिसले. तिघेही एकत्र हसताना दिसले. ऐश्वर्या सासरे अमिताभ यांचा हात धरून त्यांना आत घेऊन गेली. आराध्याला चीअरअप करण्यासाठी तिघेही एकत्र आले आहेत.
ऐश्वर्या राय लेकीच्या कार्यक्रमाला काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. तिने सूटसोबत फ्लॉवर प्रिंटेड दुपट्टा कॅरी केला होता. तर अभिषेक बच्चन ब्लॅक हुडीमध्ये दिसला होता. अमिताभ बच्चन ग्रे कलरचे जॅकेट घातलेले दिसले. ऐश्वर्या तिच्या कारमध्ये वेगळी आली होती पण लेकीला घेऊन ती अभिषेकबरोबर एकत्र परत गेली.